आपला जिल्हा

शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी शिष्टमंडळ भेटीला पाठविण्यापेक्षा काम सुरु करावे – अशोक येडे  

    • दुसऱ्या दिवशीही आम आदमी पक्षाकडून ठिय्या आंदोलन सुरूच

बीड — इमामपूर रोड – बार्शी नाका येथील रस्त्याचे काम गेल्या १ वर्षांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी वारंवार निवेदने, चर्चा करूनही नगरपरिषद प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम आदमी पक्षाने कालपासून येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कालचा दिवस व रात्रीही ठिय्या मांडत आज देखील या आंदोलनाला येथील नागरिकांनी पाठिंबा देत नगर परिषदेच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केला आहे. काल रात्री शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेतली असता आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी आधी काम सुरु करा तरच आंदोलन मागे घेतले जाईल अशी आक्रमक भूमिका घेतली.
इमामपूर रस्त्याचे काम रखडल्याने या भागात राहत असलेल्या हजारो लोकांना घाणीचा, अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, या भागातील वाहतूक खोळंबली असून सर्व जनता प्रचंड त्रस्त झालेली आहे. या आंदोलनात महिला, तरुण, जेष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून जोपर्यंत रस्ताकाम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आपने घेतली आहे.
रस्त्याचे काम रखडल्याचे परिणाम
१) गेल्या १ वर्षांपासून दळणवळनसह रस्त्याचे चालणेही झाले मुश्किल
२) सांडपाणी रस्त्यावर रस्त्यावर साचत असल्याने रोगराईच्या वाढ
३) कचऱ्याची वाहतूक होत नसल्याने संपूर्ण भागात दुर्गंधी पसरली आहे.

बीडच्या जनतेने आमदार, नगराध्यक्ष – उपनगराध्यक्षांना जाब विचारावा – राऊत, सय्यद सादेक

गेल्या २० – २५ वर्षांपासून बीडची जनता अन्याय सहन करत आहे, सर्व शहरात विकासकामे रखडली आहेत, शहरातील कामे हि नागरिकांसाठी आहेत कि त्रास देण्यासाठी हे देखील नागरिकांना समजेना झाले आहे. बीडच्या जनतेने निवडून दिलेल्या येथील स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांना जाब विचारायला हवा, जोपर्यंत जनता सजग होत नाही तोपर्यंत त्रासातून सुटका होणार नसल्याचे आम आदमी पार्टीचे ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, यांनी म्हंटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close