देश विदेश

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

पुणे — कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र लस तयार करणारा भाग सुरक्षित असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ने दिली आहे.आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 5 जणांमध्ये 4 पुरूष आणि एका महिलेचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यांना हडपसर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला आहे.

सिरम इन्स्टिट्यूट च्या मांजरी भागात असलेल्या इमारती मध्ये बीसीजी विभाग आहे. याठिकाणी याठिकाणी लस तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोरोना लसीच संशोधन आणि उत्पादनाचा विभाग याठिकाणी नसल्याने चिंता करण्याचे कुठलेच कारण नसल्याचं सिरम कडून सांगण्यात आल आहे. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याला आग लागली. आग लागलेल्या भागांमध्ये चार कर्मचारी अडकले होते त्यापैकी तिघांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले . धुराचे लोट जास्त प्रमाणात असल्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाला अडचणींना सामोरे जावे लागल््य््या चे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. सध्या जगातील सर्वात मोठी लंस उत्पादक कंपनी म्हणून इन्स्टिट्यूट चा नावलौकिक आहे. सध्या या कंपनीने बनवलेल्या कोविशिल्ड लसीकडे सर्व जग आशेने पाहत आहे. ‌

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close