आपला जिल्हा

अयशस्वी कारकिर्द राहिलेल्या रेखावारांची बदली

बीड– हुकूमशाही पद्धतीने तुघलकी कारभार करत आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांना क्रीम पोस्ट देण्याचा हातखंडा असलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची अखेर बदली झाली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा बनल्यामुळे गेवराई च्या आमदारांना उपोषणाला बसावे लागले एवढी वाईट स्थिती बीडमध्ये त्यांनी निर्माण केली होती.त्यांच्या जागी सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात अयशस्वी कारकीर्द म्हणून रेखावारांची नोंद‌ केली जात आहे. राहुल रेखावार यांना जनतेत उतरून एकही काम करता आले नाही. याबरोबरच त्यांच्या कारकिर्दीत प्रामाणिक अधिकारी चांगलं काम करू शकले नाहीत. कोरोना संकट काळात देखील मध्यरात्री निघत असलेल्या आदेशामुळे जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याबरोबरच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न देखील त्यांच्या काळात गंभीर बनला गेला. मीच फार ज्ञानवंत असा भ्रम करून घेतल्यामुळे अहंपणातून तुघलकी निर्णय त्यांंनी घेतले परिणामी न्यायालयाला देखील अनेक प्रकरणांत त्यांचे कान टोचावे लागले. हे देखील बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले.वाळू माफिया यांच्या कारकिर्दीत त्यांच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा करत राहिले मात्र त्यांना प्रशासन व्यवस्थित न हाताळता आल्यामुळे या बाबतीत देखील सपशेल अपयश आले. याबरोबरच माध्यमांनी एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली तर आशा अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करायची सोडून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाठराखण केली एवढेच नाही तर त्यांना क्रीम पोस्ट देण्यात देखील आघाडी घेतल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळालं. केवळ माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांनी कधीही ही प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे अनेक वेळा प्रसार माध्यमातून त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भ्रष्ट अधिकाऱ्यांना क्रीम पोस्ट देण्यामागे काय ‘अर्थ ‘दडला होता हे त्यांनाच माहीत. एकंदरच राहुल रेखावार यांनी बीडमध्ये आपली कारकीर्द अयशस्वीपणाने घालवल्यामुळे जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळेच फेब्रुवारी मध्ये जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेणारे जानेवारीमध्येच हाकलले गेले.

यापूर्वी बीडच्या राजकारणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची  अडचण होत असल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असत मात्र. राहुल रेखावार यांच्या कारकिर्दीने बीडची नाचक्की राज्यात होऊ लागली होती.आचारसंहिता संपताच त्यांची बदली होईल अशी शक्यता वर्तविली जात होती ती खरी ठरली. राहुल रेखावार यांना मुंबई येथे विक्रीकर विभागाच्या आयूक्त पदी नियूक्ती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत. आर एस जगताप यांनी यापूर्वी अपर जिल्हाधिकारी म्हणून बीड येथे हे काम पाहिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close