महाराष्ट्र

महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने पाडळसिंगी टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

बीड — रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा‘ हे घोषवाक्य लक्षात घेऊन रस्त्यावर वाहन चालवताना नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र गेवराई व मांजरसूंभा यांच्या वतीने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान-2021 चा शुभारंभ सोमवार दि.18 रोजी गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राठोड साहेब यांच्या हस्ते पाडळसिंगी टोल नाक्यावर करण्यात आला.


यावेळी महामार्ग पोलीस केंद्र गेवराईचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, महामार्ग पोलीस केंद्र मांजरसूंबाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गित्ते, पोलीस उपनिरीक्षक आर. एम. घोळवे, पोलीस उपनिरीक्षक श्री. घोडके, आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राठोडसाहेब यांनी वाहतूक नियम समजावून सांगितले. वाहन चालविताना नागरिकांनी मोबाईलवर बोलू नये, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवू नका, महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये तसेच भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास निमंत्रण देऊ नका यासह वाहतूकीचे नियम समजावून सांगितले. नागरिकांनी महामार्गावर सुरक्षित प्रवास करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी महामार्ग पोलीस केंद्र गेवराईचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, मांजरसूंभाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गित्ते यांनीही वाहतूक नियमांची माहिती देऊन नागरिकांनी सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन केले. नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी महामार्ग पोलीस केंद्र गेवराई व मांजरसूंभाचे वतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला असून या चित्ररथाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात येणार आहे.
यावेळी महामार्ग पोलीस केंद्राचे,अधिकारी, पोलीस कर्मचारी, आयआरबीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close