महाराष्ट्र

राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार; गृहमंत्र्यांचे संकेत

मुंबई — सध्याचा पोलिसांचा गणवेश गैरसोयीचा असल्यामुळे गणवेशात बदल करावे अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती या मागणीचा विचार करू त्याच प्रमाणे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात हाफ जॅकेटचा समावेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय लेदर बुटांऐवजी काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज पोलिसांच्या गणवेशात दाखल होणार आहेत.
पोलिसांचा गणवेश गैरसोईचा असल्याची सूचना माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी दिली आहे. तर त्यांच्या सूचनेचा विचार करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान याआधी देखील पोलिसांच्या गणवेशात वेळो-वेळी बदल करण्यात आले होते.

काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या टोपीत बदल करण्यात आले होते. तर आता पोलिसांचा पूर्ण गणवेश बदलण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासंबंधी अनिल देशमुख आणि गृहराज्य मंत्री सतीश पाटील यांनी पोलीस दलातील माजी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यामुळे येत्या काळात खाकी वर्दीला झळाळी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close