देश विदेश

उद्धव ठाकरे बेस्ट सीएम, एबीपी न्यूज सी वोटर सर्वेत स्पष्ट

मुंबई — देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. पहिल्या पाच बेस्ट सीएमच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं असून यामध्ये भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याच्या नावाचा समावेश नाही. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं. याद्वारे त्यांनी देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close