आपला जिल्हा

हॉटेल आणि धाब्यांवरची अनाधिकृत दारू पकडा अन्यथा आंदोलन– अँड. अजित देशमुख

बीड —  बेकायदेशीर दारू विक्री बाबत आणि रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्या प्रकरणात जन आंदोलनाने आवाज उठल्यानंतर जिल्ह्यातील बारा बिअर बार वर कारवाई झाल्याचे समजते. मात्र जिल्ह्यातील शेकड्यावर हॉटेल आणि धाब्यांमध्ये बेकायदेशीर दारू विक्रीचा आहे. यावर कुठलीही कारवाई होत नाही. यामुळे धाबे आणि हॉटेल वरील बेकायदेशीर दारू विकणार्‍यावर कठोर कारवाई करावी अन्यथा उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा तंबू ठोकू, असा इशारा ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

जिल्ह्यात अनाधिकृत हॉटेल आणि धाब्यावर मोठया प्रमाणात मद्य विक्री चालू आहे. यातून कोणताही महसूल मिळत नसला तरी त्यांची पाठराखण करणारे आणि संगनमत करून या ठिकाणी दारू विक्री करू देणारे खाजगीरीत्या महसूल गोळा करतात की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दारुमुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत होत असताना, दुसरीकडे अनाधिकृत गावठी आणि सर्व प्रकारची दारू बेकायदेशीर रीतीने हॉटेल आणि धाबे मालक आणि चालक विक्री करून लाखो रूपयांची माया गोळा करत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी कुचकामी ठरले आहेत.

उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कार्यालयाकडून सार्वजनिक ठिकाणी हॉटेल ढाबा वगैरे ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या जनते बाबत सूचना काही ठिकाणी ढकवल्या होत्या. या महत्वाच्या सूचना ढाब्यावाल्यानी काढून टाकल्या आहेत.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील नियमाप्रमाणे कोणत्याही ठिकाणी बेकायदेशीर दारू विकणे आणि दारूची विक्रीची व्यवस्था पाहणे यासाठी कलम ६८ अ व ब प्रमाणे तीन ते पाच वर्षे सक्तमजुरी आणि २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा आहेत.

त्याप्रमाणे व्यक्ती अवैध रीतीने दारू पिऊन मद्यधुंद झाल्याचे अथवा एखाद्या हॉटेल अनधिकृत रीतीने विक्री होत असलेली दारू पिण्यासाठी हजर झालेला असेल, असे आढळून आल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड कायद्यातील कलम ८४ प्रमाणे होऊ शकतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत गैरशिस्तीत वागत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीवर सहा महिने कैद आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड अशा प्रकारची शिक्षा कायद्यात आहे.

सार्वजनिक ठिकाणी अथवा अनधिकृत हॉटेल आणि धाबे या ठिकाणचे चालकांकडून जर ग्राहकास मद्यविक्री होत असेल किंवा उपलब्ध करून दिले जात असेल, तर संबंधित जनतेने आपल्या पोलिस स्टेशनला अथवा उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवावे. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी त्या – त्या भागातील महिलांनी पुढे यावे, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close