आरोग्य व शिक्षण

बर्ड फ्लू : लोखंडी सावरगावचा दहा किलोमीटर परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र घोषित

बीड — जिल्हयातील लोखंडीसावरगांव तालुका अंबाजोगाई येथे कोंबड्यांचा बर्ड फ्लू रोगाने मृत्यू झालेले आहेत . त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून , संबंधीत गावांच्या 1-10 कि.मी. परिसरातील गावांना पुढील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र ( Surveillance Zone ) म्हणून घोषीत करण्यात आले आहे .या गावांतील कुक्कुट पक्षांची खरेदी विक्री , वाहतूक , बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यास येत आहे . तसेच या बाबीसाठी सर्व गाव ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषित करण्यात येत आहेत . तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे . यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कोंबडीच्या मृत्यू बाबत भितीचे वातावरण निर्माण होवू नये आपल्या भागात 1 किंवा 2 कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये . सदरील मृत कावळे/ कोंबडया आढळून आल्यास ग्रामपंचायत नगरपंचायत यांच्याशी व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा . मृत कावळ्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नये मास्क वापरावा . तसेच सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निर्जंतूकिकरण करुन घ्यावा , कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येतील . मौजे लोखंडी सावरगाव पासून 0.1 कि.मी. च्या आतील लोखंडीसावरगांव शिवार हा संक्रमित क्षेत्र ( Intected Zone ) 1-10 कि.मी. परिसरातील सनगांव श्रीपतराववाडी , वरपगांव , कोळकानडी डिघोळअंबा , कोद्री , सातेफळ , हिवराखुर्द , चनई , कुंबेफळ , माकैगांव , उमराई तसंच केज तालुक्यातील होळ , दिपेवडगांव , पळसखेडा , बोरीसावरगांव व कानडी बदन ला अंबाजोगाई या गावांना पुढील आदेशापर्यत सतर्क क्षेत्र ( Surveillaneo Zone ) म्हणून घोषीत करण्यात यावे . या गावांतील कुक्कुट -पक्षांची खरेदी विक्री , वाहतूक , बाजार व प्रदर्शन आयोजित करणे यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close