क्राईम

केटरिंगच्या कामाला बोलावून महिलेला इंदोर ला विकले

श्रीरामपूर — नाशिक जिल्ह्यात असलेल्या मालेगावातील मोतीनगर भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील दोन महिलांनी केटरिंगच्या कामासाठी बोलावून घेतले होते. दरम्यान या विवाहितेला इंदोर येथे एक लाख 20 हजार रुपयांना विकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पीडित महिलेच्या पतीने श्रीरामपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अनिता रविंद्र चव्हाण रा. आंबेडकर वसाहत दत्तनगर व व तिची मैत्रीण संगीता या दोघींनी आपल्या पत्नीला कॅटरिंग कामासाठी आमच्याकडे पाठवून द्या योग्य पगार देण्यात येईल येईल असे सांगत विश्वास संपादन केला. यानंतर दोघींनी तिला मध्यप्रदेशातील इंदोर येथे हे घेऊन गेल्या याठिकाणी अज्ञात इसमाकडून एक लाख वीस हजार रुपये घेऊन तिला त्या व्यक्तीच्या ताब्यात दिले. याप्रकरणी या दोन महिला विरोधात भादवि कलम 366, 370, 370, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भापोसे आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर धायवड तपास करीत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close