आपला जिल्हा

बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी 83.58 टक्के मतदान

  • शांततेत पार पडली मतदान प्रक्रिया

बीड — पहिल्या टप्प्यातील बीड जिल्ह्यामधील 111 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 83.58 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असुन एकूण 842 उमेदवारांचे भविष्य मशीन बंद झाले आहे. 18 जानेवारी रोजी मतमोजणी ची तारीख निश्चित होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

शुक्रवारी बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया ची तयारी मागील अनेक दिवसांपासून केली होती. शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण 842 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले आहे. तालुकानिहाय ग्राम पंचायतीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

बीड 87.00
अंबाजाेगाई 83.95
माजलगाव 79.82
धारुर 76.43
केज 80.94
अाष्टी 86.65
पाटाेदा 87.72
वडवणी 83.44
परळी 83.64
शिरुर कासार 87.87
गेवराई 82.41
एकूण टक्के 83.58

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close