आरोग्य व शिक्षण

राज्यातील पाचवी ते आठवीची शाळा 27जानेवारी पासून सुरू

मुंबई — कोरोनामुळे बंद पडलेली शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. राज्यातील पाचवी ते आठवी ची शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षण विभागाच्या बैठकीवेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना काही सूचनाही दिल्या. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी असं सांगितलं.
राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा मात्र पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहतील असं सागंण्यात आलं आहे.
मार्च महिन्यात बंद झालेल्या शाळा, महाविद्यालये गेल्या दोन महिन्यापासून हळू हळू सुरू करण्यात आली. यामध्ये 9 पासून वरच्या वर्गातील शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार कोरोनाचे नियम पाळून काही नियम आणि अटींसह शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close