राजकीय

राष्ट्रवादीने न्याय दिला: धनंजय मुंडेचा राजीनामा नाही

मुंबई –. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात होती. दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांचा. राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय वादळ निर्माण झाले होते. मंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात आज पर्यंत घडलेल्या घटनांची जाहीर प्रांजळ कबुली दिली होती.त्यामुळे जनसामान्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही शंका राहिली नाही परिणामी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जनतेतून पाठबळ मिळू लागले. परंतु विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. परंतु ही महिलाच ब्लॅकमेलिंग करत असल्याचं सांगत भाजपचे कृष्णा हेगडे यांनी पोलिसात धाव घेतली मनसेचे मनिष धुरी यांनी प्रकाराला पुष्टी दिली.तसेच जेट एअरवेज मध्ये नोकरी करत असलेल्या रिजवान कुरेशी यांच्यावर देखील रेणू शर्माने गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या सर्व घडामोडींमुळे हनी ट्रॅप प्रकरणाला कलाटणी मिळाली गेली.
गुरुवारी दुपारी शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले या बैठकीला शरद पवार अजित पवार जयंत पाटील हे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close