महाराष्ट्र

‘द शो मस्ट गो ऑन… आरोप – प्रत्यारोप, राजीनाम्याची मागणी… धनंजय मुंडे मात्र जनता दरबारात लोकांची कामे करण्यात व्यस्त!

मुंबई  — एका महिलेने थेर बलात्काराचे आरोप करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप, राजीनाम्याची मागणी असा गदारोळ सुरू असताना मंत्री धनंजय मुंडे मात्र मुंबई येथील पक्षकार्यालयात जनता दरबारात भेटीला आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवताना दिसले. विशेष म्हणजे त्यांच्या जनता दरबाराला नेहमीप्रमाणेच गर्दी जमली होती!

 

एकीकडे बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेली महिलाच आता हनी ट्रॅप करणारी टोळी चालवत असल्याचे आरोप होत आहेत. त्यातून धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा, त्यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव सुरू आहे की काय अशी चर्चा पक्ष अन्य पातळीवर सुरू आहे. हे सर्व सुरू असताना धनंजय मुंडे यांनी मात्र नेहमीप्रमाणे दिनक्रम पाळत आलेल्या लोकांच्या देखील भेटीगाठी घेतल्या.

मुंबई येथील चित्रकूट बंगल्यावर, दुपारी पक्ष कार्यालयातील नियमित जनता दरबारात मुंडे लोकांना भेटी गाठी घेत त्यांची कामे करताना दिसले. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान करणे हे त्यांच्या जनता दरबाराचे वैशिष्ट मानले जाते.

राजकीय आयुष्यात एखाद्या मोठ्या नेतृत्वावर असे आरोप झाले तर तो व्यक्ती निश्चितच खचून जातो, किंबहुना अनेकदा लोकांसमोर येण्याचे टाळतात हे आपण नेहमी पाहतो. परंतु आजच्या ‘द शो मस्ट गो ऑन…’ या त्यांच्या कृतीने धनंजय मुंडे हे मात्र याला अपवाद ठरल्याचे आजच्या एकंदर घडामोडींवरून दिसून आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close