आरोग्य व शिक्षण

बीड जिल्हयात शनिवारपासून सहा ठिकाणी देणार कोरोना लस

बीड —कोविड लसीकरण मोहमेचे शुभारंभ १६ जानेवारी २०२१ रोजी केले जाणार असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोबिड लस दिली जाणार आहे. जिल्हयात एकूण ६ ठिकाणी कोविड लस दिली जाणार आहे .

कोविड १९ लसीकरणासाठी नियोजीत केलेल्या लसीकरण सत्राची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई,
जिल्हा रुग्णालय बीड, उप जिल्हा रुग्णालय परळी वै..उप जि.रु.गेवराई,उप जि.रु केज,ग्रा.रु.आष्टी ही ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत

या लसीकरण मोहिमेसाठी पोर्टलवर १४६०९ आरोग्य कर्मचारी यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

जिल्हयात पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी १७६४० डोसेस जिल्हास्तरावर प्राप्त झालेले आहेत. प्रत्येक सत्राच्या ठिकाणी प्रति दिन १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोसेस दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. लस साठवण क्षमता ३६८ लीटर किंवा २६४९७५० डोसेस इतकी आहे.
जिल्हा टास्क फोर्स तसेच तालुका टास्क फोर्स बैठका नियमित घेण्यात येत आहेत.

जिल्हयात दिनांक ८ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा रुग्णालय बीड,प्रा.आ.केंद्र वडवणी व उप जिल्हा
रुग्णालय परळी या ठिकाणी लसीकरणाची सराब फेरी (Dry Run) यशस्वीपणे घेण्यात आली. लसीकरणा दरम्यान काही गुंतागुंत झाल्यास (A.E.F.I.) आवश्यक प्रशिक्षण व तयारी करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर कंट्रोल रुम तयार करण्यात आली असून संपर्क क्रमांक ०२४२-२२८५०० हा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close