देश विदेश

चिंता वाढली: दक्षिण आफ्रिकेतील कोरोना चा भारतात प्रवेश

मुंबई — ब्रिटन पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाही मुंबईत दाखल झाला आहे. खारघरमधील टाटा मेमोरिअलमध्ये दक्षिण आफ्रिकन कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील म्युटेशन धोकादायक असल्याचे मानले जात आहे. तीन रूग्णांपैकी एक रूग्ण ठाण्यातील तर एक रायगडमधील आहे.

करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरसविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. देशात ब्रिटनमधील नव्या करोना रुग्णांची संख्याही वाढू लागली. आता त्यात दक्षिण आफ्रिकेतील नव्या विषाणूची भर पडली आहे.

कोरोना लसीबाबत भारत जगाचं आशास्थान असल्याचं म्हटलं जात आहे.
16 जानेवारीपासून भारतात कोरोना लस देण्यात येणार आहे. भारतीय लस मिळविण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहे.

भारतीय लस नेपाळ, श्रीलंकेसह मध्य आशियातील देशांना हवी आहे. म्यानमार आणि दक्षिण आफ्रिका देशांशी लस घेण्यासाठी आधीच करार झाला आहे. नेपाळ, श्रीलंका यांच्यासोबतच कझाकस्तान लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close