आरोग्य व शिक्षण

‘बर्ड फ्लू’ या आजाराबाबत तांत्रिक माहिती देणे व नकारात्मकता दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बीड —जिल्ह्यातील मुगगाव तालुका पाटोदा येथे दिनांक 07 जानेवारी 2021 रोजी ११ कावळे मृत स्थितीत आढळून आले त्यापैकी 3 कावळयांचे शव रोग निदानासाठी, रोग अन्वेषण विभाग, पुणे मार्फत NIHSAD, भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. सदरील नमुने बर्ड फ्लू (H5 N8) पॉझिटिव्ह आले आहे. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

सदरील आजाराच्या अनुषंगाने सोशल मिडिया, वृत्तपत्रे व इतर माध्यमांमधून विविध प्रकारच्या बातम्या प्रसारीत होत आहेत. सामान्य नागरिकास या आजाराबाबत तांत्रिक माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून जनतेमधील या आजाराबाबत
नकारात्मकता दूर होईल व घबराट पसरणार नाही, बर्ड फ्लू च्या अनुषंगाने घाबरून जाण्याची काहिही आवश्यकता नाही याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय बीड यांच्या वतीने प्रसिद्धीस दिले आहे.

अद्याप बीड जिल्ह्यामध्ये पाळीव पक्षांमध्ये या आगाराचे निदान झालेले नाही. तरीही आपल्या भागातील आजारी पक्षांच्या स्वँब बरोबर संपर्क
टाळावा. पक्षी व कोंबड्यांना खाद्य व पाणी दिले जाणारे भांडी डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवावेत. एखादा पक्षी मरण पावला तर अशा
पक्षांना ग्लोज घातल्याशिवाय स्पर्श करु नये व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास ताबडतोब कळवावे.

कच्चे कुक्कुट मांस विक्रेते व हाताळणारांनी काम करतांना हात पाणी व साबनाने वारंवार धुवावेत व वैयक्तीक स्वच्छता राखावी परिसर स्वच्छ ठेवावी. कच्चे चिकन व चिकन उत्पादना सोबत काम करतांना मास्क आणि ग्लोजचा वापर करावा. पूर्ण शिजवलेल्या (किमान 70°C 10 मिनिट)मांसचाच खाण्यासाठी वापर करावा.

भारतीय आहार पध्दतीत शिजवले जाणारे मांस साधरणतः 100° C ला शिजविले जाते.
तसेच आपल्या परिसरात तलाव असेल व त्या तलावात पक्षी येत असेल तर याबाबत सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग पशुसंवर्धन विभागास कळवावे.

हे करु नका-
1) अफवांवर विश्वास ठेवू नका.
2) कच्चे चिकन अंडी खाऊ नका,
3) अर्धवट शिजलेले अथवा उकडलेले चिकन पक्षी खाऊ नका.
4) आजारीो दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येवू नका.
5) पूर्ण शिजलेले मांस व कच्चे मांस एकत्र ठेवू नका,
6) एखाद्या भागात मृत पक्षी आढळल्यास काय दक्षता घ्यावी तसेच मृत पक्षाची विल्हेवाट कशी लावावी यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावाा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close