क्राईम

वाटमारी करणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्‍या स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगावात आवळल्या

बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी जवळ दोन ट्रकचालकांना अटल दरोडेखोरांनी लुटल्याची घटना 5 जानेवारी रोजी घडली होती. या दरोडेखोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव येथे मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात वापरलेली बोलेरो सह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पाडळसिंगी जवळ अट्टल दरोडेखोरांनी पाच जानेवारी रोजी दोन ट्रक चालकांना लुटल्याची घटना घडली होती. या दरोडेखोरांनी या लूटी साठी वैजापूर येथील एक बोलेरो गाडी देखील चोरून आणली होती. याच गाडी च्या साह्याने ते चोऱ्या करत होते.हे अटल दरोडेखोर कोपरगाव येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी.जी. दुल्लत यांचे पथकाने कोपरगावला जाऊन त् दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या तर तिघे जण फरार झाले. या वेळी पोलिसांनी आरोपी प्रवीण उर्फ पप्पु बापु साळवे वय 19 वर्षे, रा. देवळाला ता. येवला जि. नाशिक, दुसरा आरोपी राहुल ऊर्फ मोगली इंद्रजीतसिंह कोरी रा. कोपरगाव जि. नगर या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीची बोलेरो (क्र. एम.एच. 15 बी.एन. 4188) व पाडळसिंगी येथे चोरीचे दोन मोबाईल आणि काही नगदी रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता, लोखंडी रॉड आदी साहित्य जप्त केले आहे. या अट्टल दरोडेखोरांवर राहता येथे 395, 392 नुसार गुन्हे दाखल आहेत. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक बी.जी. दुल्लत, पो.हे.कॉ. शेख सलीम, तुळशीराम जगताप, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, विकास वाघमारे, अतुल हराळे यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close