क्राईम

चौसाळा पोलिसांकडून पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात विनापरवाना वृक्षतोड

बीड — एकीकडे नेकनूर चे पी आय लक्ष्‍मण केंद्रे वृक्षप्रेमी असल्याचा आव आणत असताना दुसरीकडे त्यांचेच कर्मचारी उस्मानाबादच्या पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेतील झाडांची विनापरवाना कत्तल करत आहेत.

याठिकाणी सपाटीकरण करून वरिष्ठांच्या हस्ते वृक्षलागवड करत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्या विरोधात पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

 

नेकनुरचे पीआय लक्ष्‍मण केंद्रे वृक्षप्रेमी असल्याचं चित्र निर्माण करत जनसेवेचा बुरखा पांघरून घेत आहेत. परंतु जे कायदा-सुव्यवस्थेच चित्र निर्माण केल जात आहे. त्यापेक्षा विपरीत परिस्थिती चौसाळा व नेकनुर परिसरात निर्माण झाली आहे. अवैध धंद्यांच माहेरघर बनत चाललेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत नंबर दोनच्या धंद्यांना सुगीचे दिवस आले आहे. पोलीस चौकी असो की चेक पोस्ट असो पोलिसांची वाटमारी राजरोस सुरू आहे. कायद्याचे तिन‌- तेरा वाजवण्यात गुन्हेगारांपेक्षा पोलिसच अग्रेसर असल्याचं चित्र सध्या निर्माण झाल आहे.
चौसाळा शहराच्या बाहेर उस्मानाबादच्या पाटबंधारे विभागाच्या जागेत पोलीस चौकी आहे. याठिकाणी पाटबंधारे विभागाने मोठ्या प्रमाणात लिंब, गुलमोहर, निलगिरी यासारख्या वृक्षांची लागवड करून परिसर सुरेख बनवला. निसर्गरम्य बनवलेल्या या जागेतील झाडांची वृक्षतोड पोलिसांनी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी पाटबंधारे विभागाची परवानगी अथवा वनविभागाची परवानगी घेण्याचे कष्ट देखील घेतले नाहीत. पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या झाडांची विनापरवाना तोड करून जेसीबीच्या साह्याने या जागेचे सपाटीकरण करत आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते याठिकाणी वृक्ष लागवड करत आम्ही किती वृक्षप्रेमी आहोत आम्ही किती सामाजिक उत्तरदायित्व निभावत आहोत असा अविर्भाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे मोठ्या चा आला गाडा गरिबाची झोपडी मोडा अशी स्थिती पाटबंधारे विभागाची झाली असल्याचं आता जनतेत विनोदाने बोलले जाऊ लागले आहे.विनापरवाना वृक्षतोड करत असताना आपण कायदा हातात घेतो आहोत याचे भान पोलिसांनाच न राहिल्यामुळे हे कूठल्या कायद्याचं पालन करत असतील? असा सरळ सरळ प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले जात आहे. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, पाटबंधारे विभाग उस्मानाबाद व वनविभाग याप्रकरणी कारवाई काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close