आरोग्य व शिक्षण

मुगगाव शिवारातील ‘ कावळ्यांचा मृत्यू ‘ बर्ड फ्ल्यू मुळेच

बीड — पाटोदा तालुक्यात मुगगाव शिवारात अचानक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दोन दिवसापूर्वी त्या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. याची भोपाळ शाळेमध्ये तपासणी केली असून ‘ त्या ‘ मृतावस्थेत सापडलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळेच झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी मुगाव मध्ये कावळ्यांचा झालेला मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाला असल्याचे केंद्र सरकारकडून तोंडी सांगितलेले आहे. अद्याप पर्यंत लेखी आलेले नसल्याचेही ते म्हणाले.

पाटोदा तालुक्यातील मुगगाव मध्ये दोन तीन दिवसापूर्वी तब्बल 26 कावळे मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले होते. यामुळे मुगगाव सह परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत. सोमवारी मृतावस्थेत आढळून आलेल्या त्या सहा कावळ्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल येणे अपेक्षित होते त्यानुसार मृत अवस्थेत आढळलेल्या त्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी सांगितले. याबाबत सोमवारी केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी ते कावळे बर्ड फ्लू मुळे दगावले असल्याची तोंडी माहिती दिली आहे. अद्याप पर्यंत आम्हाला याबाबतचे लेखी पत्र नसल्याचेही ते म्हणाले.

नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही-

बीड जिल्ह्यात दगावलेल्या त्या कावळ्यांचा रिपोर्ट बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्याचा आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. जर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पशुपक्ष्यांच्या पानवठ्या च्या शेजारी एखादा मृतावस्थेत पक्षी आढळून आला तर संबंधित पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती द्यावी. असे डॉ. देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close