आपला जिल्हा

जिल्ह्यात गौण खनिज वाहतुकीसाठी वाहतुक परवाने वापरणे बंधनकारक

बीड — जिल्ह्यात गौण खनिज वाहतुकीसाठी वाहतुक परवाने वापरणे बंधनकारक — बीड जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात येणारे गौण खनिज तात्पुरता उत्खणन परवानगी (दगड,माती, मुरुम) च्या वाहतुकीसाठी यापुढे वाहतुक परवाने वापरणे बंधनकारक करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे आवाहन केले आहे.

महसुल व वनविभाग यांच्या पत्रकामार्फत क्र.गौ.ख./10/0915/प्र.क्र.463/ख.दि. 12-नोव्हेंबर 2020 अन्वये गौण खनिजाच्या अवैध उत्खणन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतुक परवाना देण्याबाबत बीड जिल्हयामध्ये वेगवेगळे प्रारुप वापरले जात आहे. त्यामुळे वाहतुक परवान्याबाबत एकसंधता दिसून येत नाही ज्यामुळे खोटे वाहतुक पास बनवून वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यास राज्यात गौण खनिजाचे अवैध उत्खणन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील वाहतुक परवान्यामध्ये एकसुत्रता येण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी वाहतुक परवान्याचे प्रारुप निश्चित करण्यात आलेले आहे.
बीड जिल्हयातील मंजूर करण्यात आलेल्या सर्व खाण पट्टाधारक (स्टोन क्रेशर) यांना यापुढे दगड,खडी वाहतुकीसाठी परवाण्यासह वाहतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे गौण खनिज वाहतुक करणा-य वाहनासोबत शासन पत्र दि. 12 नोव्हेंबर 2020 नुसार गौण खनिज वाहतुक परवाना नसल्यास ही वाहतुक अवैध समजण्यात येऊन या वाहनावर प्रचलित शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल.
तसेच या क्षेत्रामध्ये सदर वाहन आढळून येईल त्या क्षेत्रातील संबधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाविषयी कारवाई करण्यात येईल याची सर्व संबधितांनी गाभिर्यांने नोंद घेण्याच्या सूचनाही या पत्रकात करण्यात आल्या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close