आपला जिल्हा

शहर विकासासाठीचे नऊ प्रस्ताव शासनाकडे दाखल- नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

        • सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना भर सभागृहात झापले

बीड — आज सोमवारी बीड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी वेड शहराच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली कामे करून घेण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना भर सभागृहातच झापले त्यामुळे भुयारी गटार आणि अमृत अटल योजनेच्या कामाला गती मिळणार आहे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनीही सम्बधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे करा नसता न्यायालयात जावे लागेल असा इशारा दिला तसेच बीड शहराच्या विकासासाठी 9 प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात येणार असून ही कामे 129 कोटी रुपयांची आहेत याबाबतही सभाग्रहात माहिती देऊन प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी घेण्यात आली

आज सोमवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सभाग्रहात बीड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये शहरातील सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील अडीअडचणी आणि कामांबाबत प्रश्न उपस्थित केले यावर नगराध्यक्षांनी देखील सकारात्मक भूमिका घेऊन शहरातील वाहतुकीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत ती तात्काळ सुरू करावीत अंडरग्राउंड ड्रेनेजची कामे पूर्ण करून नंतरच रस्त्याची कामे करावी लागतील ही कामे खोळंबली आहेत त्याबाबत नगरपालिकेने देखील तक्रारी दाखल केले आहे जीवन प्राधिकरण यांच्या कारभारामुळेच शहरवासीयांना हा त्रास होऊ लागला आहे ही बाब आज सभागृहात सर्व नगरसेवकांनी देखील प्रकर्षाने मांडली यावर नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वीच ही कामे करा नसता कामे रद्द करावी लागतील शहरातील भुयारी गटार व रस्त्यांच्या कामाबाबत सभाग्रहात गांभीर्याने चर्चा होत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष देऊन ही कामे पावसाळ्यापूर्वीच करून घ्यावीत अशा सूचना दिल्या. आज आज झालेल्या सभेनंतर नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी सभेत झालेल्या विविध विषयावर माहिती दिली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती अंतर्गत 2020 21 या वर्षातील प्रस्तावित कामांना मान्यता देणे दलीतो तर अंतर्गत सन 2020 21 या वर्षातील प्रस्तावित कामांना मान्यता देणे शासन स्तरावर विविध योजनेअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या प्रस्तावित कामांना मंजुरी देणे अग्निशामन सेवा सुविधा व नगरोत्थान (जिल्हा स्तर) या योजनेअंतर्गत कामांना मान्यता देणे, बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह वार्षिक भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदेस मान्यता देणे, बीड नगरपालिकेच्या हद्दीतील संत भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमीतील प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीस मान्यता बीड शहरातील स्वराज्य नगर येथे ते नदीच्या कामाला मंजुरी मिळणे विशेष म्हणजे महिला बचत गटास बीड शहरातील भाजी मंडई येथील अहिल्याबाई होळकर सभागृह भाडेतत्त्वावर देण्याबाबतही मंजुरी देण्यात आली आठवडी बाजार व दैनंदिन बाजार वसुलीचा ठेका सन 2021 या वर्षाच्या ई-निविदा मान्यता देण्यात आली तसेच पाणीपुरवठा योजना व नगर परिषद कार्यालयाच्या एनर्जी ऑडिटलाही सभागृहात मान्यता देण्यात आली बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथील भाजी मंडई मच्छी मार्केट भोईवाडा व बुंदेल पुरा येथील इमारतीचे भाडे निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय देखील सभागृहात घेण्यात आला,तसेच शहरातील विविध समाजाच्या स्मशानभूमी नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामाबाबत ही नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी मंजुरी दिली यामध्ये कंकालेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वाणी समाज मशानभुमी ढोर समाज स्मशान भूमी वडार समाज प्रशांत भूमी मसणजोगी समाज स्मशान भूमी चांभार समाज स्मशानभूमी बाबू शहा कबरस्थान याठिकाणी नागरिकांसाठी बैठक व्यवस्था शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा पुरवण्यासाठी संबंधित समाजाकडून मागणी येत असून यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून शासनास पाठवणार असल्याचे सांगितले या कामासाठी 15 कोटी चा प्रस्ताव करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली

बीड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला असून जवळपास 9 प्रस्तावना मान्यता घेण्यात आली हे सर्व प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात येणार असून जवळपास 129 कोटी रुपयांची ही कामे मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहितीही ही नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी दिली यावेळी सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी एकत्रितपणे बीड शहरातील सुरू असलेल्या भुयारी गटार व अमृत योजनेच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना भर सभागृहातच झापले अंडरग्राउंड ड्रेनेजचे 163 किलोमीटर अंतर असलेले काम मुदतीत न झाल्यामुळे दोन वर्षात केवळ 50 किलो मीटर चे काम झाले असल्याचे सभागृहासमोर निदर्शनास आले आहे ही कामे न झाल्यामुळे शहरातील जनता केवळ नगरपालिकेला जबाबदार धरत आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ही कामे पूर्ण करून घ्यावीत असे सुचवले
यावेळी सभागृहात नगरसेवक भीमराव वाघचौरे यांनी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यकाळात शहरातील प्रत्येक प्रभागात कुठलाही भेदभाव न करता निधी देऊन विकास कामे केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला यावर सर्वच नगरसेवकांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन केले तसेच शहरातील 18 डीपी रस्ते आहेत त्यालगत असलेल्या जवळपास 30 टक्के इमारती नगरपालिकेच्या नोंदणीत नाहीत त्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न बुडत आहे या इमारतींच्या नोंदणी करून घ्याव्यात स्मशानभूमीतील पथदिव्यांची उंची कमी करून त्या ठिकाणच्या दुरुस्तीची कामे तात्काळ करावी याठिकाणी स्टाईल फरशी बसवण्यात आले आहेत त्याजागी शहाबादी फरशी किंवा गट्टू बसवावेत अशी मागणी त्यांनी केली यावेळी मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे,जीवन प्राधिकरण चे अधिकारी न प चे अधिकारी उपस्थित होते

बीड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शासनाकडे 129 कोटी रुपयांचे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे यामध्ये

1- जिल्हा वार्षिक योजना सन 2020 21 अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने साठी आठ कोटी 66 लाख 41 हजार 650
2- जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार वीस एकवीस दलितेतर योजनेसाठी तीन कोटी 31 लाख 52 हजार 214
3- शासनाच्या विविध योजनेअंतर्गत बीड नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान पाच कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद 15 कोटी विशेष रस्ता अनुदान 15 कोटी नाट्यग्रह दुरुस्ती विशेष अनुदान विशेष सहाय्य पाच कोटी 15 व्या वित्त आयोग सन 2020 21 निधीअंतर्गत काडीवडगाव पंपिंग स्टेशन कडे जाणारा जोड रस्ता करण्यासाठी 47 कोटी रुपये अल्पसंख्यांक निधी 15 कोटी प्रत्येक दलितेतर प्रभागात प्रत्येकी 50 लाखाचा निधी तसेच बीड शहरातील अग्निशामक सेवा सुविधेसाठी नऊ लाख तर बीड शहरात कर्मचाऱ्यांसाठी निवास्थान बांधकामासाठी 70 लाखाचा निधी देण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे घेणार आढावा बैठक

काही दिवसांपूर्वीच बीड शहरातील विविध विकास कामांच्या संदर्भात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानुसार मंत्री एकनाथ शिंदे हे 16 जानेवारी रोजी बॅड शहरात येत असून बीडमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटार योजना अमृत अटल योजना, रस्ते विकासाची कामे व नगरपालिकेच्या विकासाच्या संदर्भात ते आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close