आपला जिल्हा

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दारू पाजणाऱ्यांना मत देऊ नका – अँड. अजित देशमुख

बीड —  ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू आहे. येत्या पंधरा तारखेला गुरुवारी ग्रामपंचायतचे मतदान होत आहे. त्यामुळे आता मुरलेले राजकारणी आणि त्यांचे बगलबच्चे मतदारांना दारू आणि मटनाच्या पार्टी देत आहेत. असे चित्र बरेच ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे दारू पाजणाऱ्यांना मत देऊ नका. त्याचप्रमाणे ज्या घरातील माणूस मतदान करण्यासाठी उमेदवाराची दारू पिऊन येत आहे. त्या घरातील अन्य मतदारांनी दारू पाजणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

मतदान करण्यासाठी प्रलोभन दाखवली जाते. अशा प्रकारचे कोणतेही प्रलोभना मतदारांनी बळी पडू नये. एका मताची किंमत किती आहे हे मतदारांनी जाणून घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर अजूनही अनेक गावांना सुविधा मिळत नाहीत. त्याचा परिणाम विकली गेलेली मते हेचआहे. त्यामुळे मतदारांनी मत विकण्याचा प्रयत्न करू नये अथवा मत विकू नये.

मतदान जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे. यासाठी उमेदवार सर्व प्रकारच्या युक्त्या आणि प्रयुक्त्या वापरतात. मतदारांवर दबाव आणणे, मतदारांच्या लहान लहान मागण्या मान्य करू, असे आवाहन करून चुकीच्या पद्धतीने आश्वासन देणे, अशाही बाबी यावेळी राहतात.

दारूने अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात राजकारण कारणीभूत आहे. कुटुंबातील एक सदस्य जर दारू पीत असेल तर पूर्ण कुटुंबच नाही, तर एक पिढी बरबाद होते. त्यामुळे आपल्या गावांमध्ये कोण उमेदवार दारू पाजत आहे, कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या नेत्याचे त्याला समर्थन आहे, या बाबींकडे जनतेने लक्षात ठेवावे आणि त्या – त्या वेळी त्या – त्या उमेदवारांना पराभूत करावे. मतदारांनी कोणत्याही परिस्थिती मध्ये मत विकू नये. चारित्र्य शुद्ध ठेवून पारदर्शकता ठेवून काम करणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे,असे आवाहन देखील देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close