कृषीवार्ता

दूध संकलन केंद्राचा केज तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदाच होणार-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

केज — दूध उत्पादन हा पर्यायी उत्पादनाचा भाग आहे बीड तालुका दूध संघाने आता नवीन मशिनरी खरेदी केली आहेत गुणवत्ता आणि दर्जेदार दूध ग्राहकांना मिळावे हाच या मागचा उद्देश आहे केज तालुक्यातील शेतकऱ्यांना या दूध संकलन केंद्राचा अधिकाधिक फायदा होणार आहे दूध संघाच्या वतीने शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जाईल यासाठी शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचे दूध या ठिकाणी संकलित करावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

केज शहरापासून जवळच असलेल्या पिसेगाव रोड वर केशर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रोडूसर कंपनी संचलित दूध संकलन व शीतकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर ह-भ-प ज्ञानोबा माऊली मंजरीकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रमेश आडसकर, नगराध्यक्ष आदित्य पाटील, माधवराव मोराळे, शेषेराव फावडे,प्रा जगदीश काळे, विक्रम बाप्पा मुंडे,शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे,अंकुशराव इंगळे, रमाकांत मुंडे,सुरेश राव पाटील, जिल्हा परिषद सदस्य संतोष हंगे दिनकर कदम,ह भ प भागवताचार्य अशोक बापू थोरात, महादेव आप्पा चौरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख रत्नमाला शिवदास मुंडे, विजय भन्साळी,किसन कदम, रामभाऊ गुंड दिलीप गुळवे मोहन गुंड विकास गुंड बाळासाहेब सोनटक्के देवानंद कदम शत्रुघ्न इंगळे अरुण सावंत राजाभाऊ निर्मळ आधी उपस्थित होते यावेळी दूध संघाचे कार्यकारी संचालक श्रीखंडे, अध्यक्ष विलास बडगे, केशर मिल्क चे अध्यक्ष नानासाहेब काकडे, उपाध्यक्ष मनोज पाठक बाबासाहेब खिल्लारे,मनोज कुटे, जगन्नाथ मोरे भागवत घोडके महेश शिंगण शेषराव कोळेकर राहुल बडगे नवनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले
या कार्यक्रमातच दूध संघाचे शीतकरण केंद्र उघडल्या बद्दल ग्रामपंचायत पिसेगाव येथील सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व बाळकृष्ण हंकारे किसन कदम,रत्नाकर शिंदे यांनी माजी मंत्री क्षीरसागर यांचा सत्कार केला

यावेळी प्रास्ताविक विलास बडगे,नानासाहेब काकडे यांनी केले तर रत्नाकर शिंदे आदित्य पाटील रमेश आडसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आशीर्वाद पर भाषण करून दूध संघाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, दूध उत्पादन हा पर्यायी उत्पादनाचा भाग आहे दूध संघाने नवीन मशिनरी खरेदी केली आहे गुणवत्ता टिकून दर्जेदार व भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावे हा उद्देश आहे या केंद्रामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल या वर्षी उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होणार आहे निसर्गाचे काल चित्र विचित्र आहे त्यामुळे कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतात शेतकऱ्यांच्या दृष्टीने दूध उत्पादन हा मोठा आधार आहे भविष्यकाळ चांगला असतो वेळ बदलतो प्रयत्न करावे लागत असतात त्यामुळे यश नक्कीच मिळते जनतेचे आशीर्वाद असले तर काही अवघड नाही सरकार आपलेच आहे अनेक प्रश्न आहेत ते सोडून घेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो केज असो की अंबाजोगाई जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने पुढाकार घेत असतो कोरोनाची माहामारी आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यातून सावरण्यासाठी आता मार्ग काढणे गरजेचे आहे दूध संघाच्या माध्यमातून भविष्यकाळात दूध पावडर प्लांट सुरू करणार आहोत त्याचबरोबर दूध संघाच्या दुग्धजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे दर्जेदार उत्पादन केल्यामुळेच ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे शेतकऱ्यांनी चांगले दूध संघाकडे दिले तर त्यांना चांगला भाव मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल संघ नक्कीच यशाच्या शिखरावर जाईल आज या ठिकाणी संत महंत यांच्या हस्ते आणि त्यांच्या पदस्पर्शाने हा कार्यक्रम होत आहे चाकरवाडीच्या महाराजांच्या हस्ते जो उपक्रम सुरू होतो तो नक्कीच जनहिताच्या दृष्टीने फायद्याचा ठरतो याचा मला विश्वास आहे बीड जिल्ह्याच्या प्रश्नाबरोबरच मराठवाड्याचा पाणी प्रश्न ही तितकाच महत्त्वाचा आहे यासाठी वॉटर ग्रीड योजनेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची तहान तर भागणारच आहे परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे यावेळी केज परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close