आपला जिल्हा

शुभम खाडेंना धारूरचा आदर्श पत्रकार पुरस्कार

बीड — बीड येथील पत्रकार शुभम नामदेव खाडे यांना धारूरचा ‛आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण धारूरमध्ये गरड मंगल कार्यालयात उद्या (दि.११) सकाळी ११ वाजता होणार आहे.

दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके हे असणार आहे. भाजप नेते रमेश आडसकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे, नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी, तहसीलदार वंदना शिडोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुभम खाडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close