आपला जिल्हा

स्वामी साहेब सावधान! अशीच ढिलाई राहिली तर जनतेची सोडा तुमची सुद्धा चड्डी पोलिस विकतील

बीड — राजा रामास्वामी साहेब हे बीड आहे. याचा दरारा ही फार मोठा आहे. त्यामुळेच वाळू उपसा करण्यात तुमचे कर्मचारीच मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याबरोबरच जप्त केलेल्या गाड्या विकण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. एवढेच नाही तर चौसाळा चौकी ज्या ठिकाणी आहे. त्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील झाडे देखील विनापरवाना तोडून विक्री सुरू केली आहे.वेळ आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुद्धा चड्ड्या काढून विकायला हे कर्मचारी मागेपुढे पाहणार नाहीत त्यामुळे वेळीच सावध व्हा व कारवाई करा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे

गेवराई येथे भरधाव वेगाने वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परने शेतकऱ्याच्या चिंधड्या केल्या. वाळू चोरीच्या या गोरख धंद्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं त्यांचे टिप्पर चालू असल्याच तर वास्तव सत्य समोर आलं आहे. याबरोबरच गुटखा माफियांना देखील पोलिसांच संरक्षण मिळत असल्याचं स्पष्ट चित्र जिल्ह्यात दिसत आहे. बनावट दारू विक्रीचा धंदा तर अगदी राजरोस सुरू आहे. मटका जुगार यांना सुगीचे दिवस आल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. चौसाळा सारखे चेक पोस्ट तर उघड उघड खाकी वाल्यांना लुटीचे केंद्र बनले आहे.
पोलीसच रक्षका ऐवजी भक्षकाच्या भूमिकेत दिसू लागले आहेत. अधीक्षक साहेब तुमचा कार्यकाळ तर पर्वणी म्हणूनच सापडला आहे. यातच सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी पोलीस ठाण्यात जावं तर भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती नेकनूर पोलिसांनी केली आहे. याला आपलं अभय जरी मिळत असलं तरी ते तुमच्या साठी सुद्धा धोक्याचं आहे. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे. त्यामुळेच चौसाळा चौकीतील पोलीस आता गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गाड्या व त्यांचे स्पेअर पार्ट काढून भंगार भावात विकू लागले आहेत. एवढेच नाही तर ज्या पाटबंधारे विभागाच्या जागेत पोलीस चौकी आहे. त्या परिसरातील निलगिरीची झाड या तुमच्याच लोकांनी विकली आहेत. तुमच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी आधीच व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिली तर जनतेचे सोडा पण अधीक्षक साहेब तुमची चड्डी सुद्धा विकायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत असं आता जनतेतून बोलले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close