क्राईम

पन्नास हजाराची लाच घेताना तलाठी व त्याचा सहाय्यक एसीबीने पकडला

केज — खरेदी केलेल्या जमिनीतील पाझर तलावासाठी संपादित केलेले क्षेत्र सातबारा वरून कमी न करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच तलाठ्याने मागितली होती. यात तडजोडीनंतर 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तलाठी व त्याच्या सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केज तहसील आवारात रंगेहात पकडले.
दयानंद शेटे वय 43 वर्ष असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे तसेच त्याचा खाजगी सहाय्यक सचिन घुले वय 31 वर्ष हा देखील पकडला गेला. तक्रारदाराने 23 आर जमीन खरेदी केली होती त्यापैकी 8 आर जमीन पाझर तलावासाठी संपादित केलेली होती. हे संपादित क्षेत्र सातबारा वरून कमी न करण्यासाठी टाकळी सज्जाचा तलाठी दयानंद जगन्नाथ शेटे याने एक लाख रुपयाची लाच तक्रार दाराकडे मागितली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर पंचा समक्ष 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे तलाठ्याने मान्य केले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पैसे स्वीकारताना तलाठ्याचा खाजगी इसम सचिन घुले यास रंगेहात पकडले. एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अनिता जमादार पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपूडे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत गोरे प्रदीप वीर मनोज गवळी चालक संतोष मोरे गणेश म्हेत्रे यांच्या टीमने ही कारवाई पार पाडली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close