ब्रेकिंग

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या विरोधात घंटानाद आंदोलन

बीड– उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी बीड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी घंटानाद आंदोलन करून निदर्शने केली.

उत्तर प्रदेशातील एका 50 वर्षीय महिलेवर अत्याचार विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादीच्या महिलांनी आंदोलन केले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत सरकार गंभीर नाही. असे म्हणत योगी सरकारवर टीका केली. बीड शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर जमून घंटानाद करीत निदर्शने करत टपाल मास्टर यांना महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अजय बिष्ट यांच्या नावे लिहिलेली पत्रे त्यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी दिली.

महिला असुरक्षित असल्याचा केला आरोप –

उत्तर प्रदेशातील महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत अजय बिष्ट सरकार गंभीर नाही. फक्त शहरांची नावे बदलण्यातच उत्तर प्रदेशातील सरकार गुग आहे. त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, यांच्या सह अंगणवाडी च्या ५० वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत, त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे, अशा आशयाची पत्रे महिलांनी उत्तरप्रदेश सरकार ला लिहिली आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close