क्राईम

पिकअप-मोटार सायकल अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी

बीड — आष्टी शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या पोल फॅक्टरी जवळ लोणी वाकीवरून कांदा घेऊन भरधाव वेगाने जाणा-या पिकअपने मोटार सायकल स्वारास धडक दिली.यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली.

कानिफ वांढरे (वय- 38) असे अपघातात जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले असून,जखमींवर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात सुरू आहेत. याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आहे की, बीड जिल्हयातील आष्टी शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या पांढरी येथील कानिफ वांढरे आपल्या शेतातील पोल्ट्री फाॅर्मवर गेले होते. कानिफ वांढरे हे आपल्या मोटार सायकल (क्र.एम एच 23 ए यु 5180) ह्यावरून आपली पत्नी सोनाली कानिफ वांढरे (30) व मुलगी संस्कृृृृती कानिफ वांढरे (9) हे घरी येत असतांना पोल फॅक्टरीजवळ आले असता लोणी वाकी येथील शेतक-यांचा कांदा पिकअप (एम एच 14 व्हि 909) यामध्ये अहमद नगर येथे घेऊन जात असतांना समोरासमोर अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल स्वार हा जागीच ठार झाला तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले असून,
त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, मयत कानिफ वर दुपारी दोन वाजता शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. आष्टी पोलिसांत पिकअप विरूध्द गुन्हा दाखल झाला असून,पिकअपचा चालक फरार झाला आहे.पुढील तपास पो.हे.संजय गुजर हे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close