क्राईम

खजाना विहीर परिसरात आढळला मृतदेह

बीड– शहरापासून जवळच असलेल्या खजाना विहीर परिसरात शुक्रवारी 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली असून मृत्यूचे कारण अद्यापअस्पष्ट आहे.

परमेश्वर नाथाराम गव्हाणे (वय. 28
रा. चक्रधर नगर बीड) असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, दुपारी बाराच्या सुमारास बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन आल्याने माहिती मिळाली की, खजाना विहीर परिसरांमध्ये एक अज्ञात मृतदेह असल्याची पोलिसांना खबर्‍याने माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा याबाबत पोलिसांनी चौकशी केली, असता बीड शहरातील चक्रधर नगर भागातील रहिवासी असून परमेश्वर नाथाराम गव्हाणे असे नाव असल्याचे तपासात समोर आले. परमेश्वर याने आत्महत्या केली आहे की, त्याच्याबरोबर घातपात झाला आहे.याचा तपास सूरू आहे. मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच परमेश्वर यांच्या मृत्यूचे गूढ स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close