महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारुढ तैलचित्राचे वाफगाव येथे थाटात प्रकाशन

पूणे –महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेक सोहळा वाफगाव ता.राजगुरूनगर जि.पुणे येथे दि.6 जानेवारी 2021 रोजी संपन्न झाला या राज्यभिषेक सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारुढ तैलचित्राचे थाटात प्रकाशन संपन्न झाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे अश्वरुढ चित्र असावे अशी भावना समाजातील अनेकांची होती ऐतिहासिक संदर्भ तपासणी केले असता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अमेड,रामपुरा, सुलतानपुर,मांडवगण सह आदी युद्धात स्वतः सहभागी होवून युध्द संचालन केलेले आहे.28 वर्षे राज्यकारभार करीत असतांना अमेड चा किल्ला घेण्यासाठी त्या स्वतः युध्द मैदानात उतरल्या होत्या तर रामपुरा येथील चंद्रावताचे बंड अहिल्यादेवी नी युद्ध जिकुंन केले होते तर राघोबादादा महेश्वर वर चालुन येत असल्याचे माहिती होताच अहिल्यादेवी नी स्त्रियांची फलटण उभी करुन दोन हात करण्याची तयारी दाखवली होती.

त्यांच्या या व्यक्तीरेखा तैलचित्रातुन साकारण्यासाठी मोहोळ च्या आसिफ शिकलगार यांनी होळकर रियासतीचे अभ्यासक रामभाऊ लांडे व बापुसाहेब हाटकर यांच्या संदर्भाने अहिल्यादेवी चे अश्वरुढ तैलचित्र साकारले.

खंडुतात्या तांबडे, श्रीधर गोरे,संतोष वाघमोडे, रामभाऊ लांडे,जिजाभाऊ मिसाळ यांनी अथक परिश्रम घेत श्री खंडेराय फांउडेशन च्या माध्यमातून तैलचित्र तयार केले आहे यासाठी समाजातील दानशूर लोकांनी आर्थिक सहकार्य केले.

तैलचित्राचे आ.गोपीचंद पडळकर,(MLA.GOPICHAND PADALKAR) सुरेशभाऊ कांबळे,भुषणसिंह होळकर, प्रा.यशपाल भिंगे, अर्जुन सलगर,नवनाथ पडळकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न झाले.तैलचित्र प्रकाशित झाल्यानंतर आमदार पडळकर म्हणाले कि अहिल्यादेवींचे नविन तैलचित्र ऐतिहासिक असे असुन इतिहासात याच चित्राची नोंद होईल अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमासाठी भगवान ज-हाड,नवनाथ बुळे,रोहित पांढरे, अक्षय बर्वे,आनंद कोकरे,नितीन शेंडगे, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी 28 वर्षे राज्यकारभार करीत असतांना प्रजेच्या प्रती राज्यकर्त्याची जबाबदारी पालकासमान असते प्रजेच्या हितासाठी न्याय, निती,तत्वाने राज्यकारभार करावा लागतो असा आदर्श उभा करीत संपूर्ण भारतभर त्यांनी बाराज्योतिर्लिगांहीत सप्तपु-यांचा जिर्नोध्दार करीत ,प्रत्येक तीर्थक्षेत्री मंदिर, घाट,तलाव, नंदादीप, कावड,अन्नछत्र, बारव,वाडा निर्माण करुन तीर्थयात्रेकरुना सोयी सुविधा निर्माण करुन दिल्या यासाठी जो खर्च केला तो त्यांच्या खाजगीतुन केला म्हणून त्यांना गंगाजळ निर्मळ पवित्र म्हटल्या जाते तर 24 तास प्रजेस न्यायदान करुन वेळप्रसंगी हातात तलवार घेवून रणांगणात लढण्याची तयारी दाखवली होती.

त्यांनी अनेकदा दानधर्मासाठी हातात शिवलिंग घेवुन तुलादान खाजगी धनाच्या माध्यमातून करुन अनेकांना मदत केली त्यांच्या या दातृत्वाचा समाज मनावर लोककल्याणकारी पुण्यश्लोक माता म्हणून लौकिक असल्याने हातात शिवलिंग असलेले चित्र घराघरांत देवघरात पहायला मिळते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close