राजकीय

परळी पंचायत समिती सभापती विरोधातील अविश्वास ठराव मंजूर

बीड — परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्या विरोधात गुरुवारी अविश्वास ठराव बहुमताने मंजुर झाला. यादरम्यान उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी पिठासीन अधिकारी म्हणुन काम पाहिले. समितीमध्ये एकूण 11 पंचायत समिती सदस्य आहेत त्यापैकी 4 भाजप 1 माकप तर उर्वरित 6 पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आपली मते नोंदवली आहेत. परळी पंचायत समितीमध्ये अविश्वास ठरावाच्या निमित्ताने बहिण भाऊ एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

परळी पंचायत समिती सदस्यांनी सभापती उर्मिला शशीकांत गित्ते यांच्या विरुध्द अविश्वास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. त्या अनुषंगाने गुरूवारी परळी तहसील कार्यालयात पंचायत समिती सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पंचायत समिती 11 पैकी 10 सदस्स हजर होते तर उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने 10 हजर सदस्यांनी सभापती विरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजुने हात उभे करुन मतदान केल्याने सभापती विरुध्द ठराव मंजुर झाला आहे. इतर वेळी एकमेकाला राजकीय आखाड्यात पाण्यात पाहणारे मुंडे बहीण- भाऊ या अविश्वास प्रकरणात मात्र एकत्र आल्याचे दिसून आले .भाजपच्या दोन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना मदत करीत गित्ते यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मदत केली .यामुळे परळीत एक नवे समीकरण पाहायला मिळाले.

चोख पोलिस बंदोबस्त 
मागील आठवडाभरापासून परळी पंचायत समिती मध्ये उलटापालट होण्याच्या हालचाली छुप्या पद्धतीने सुरू होत्या अखेर गुरुवारी सभापती यांच्याविरोधात अविश्वास ठराव पास झाला आहे यादरम्यान शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close