महाराष्ट्र

डिजिटल मीडिया पत्रकारांनी साजरा केला दर्पण दिन

6 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात साजरा होणारा पत्रकार दिन म्हणजेच दर्पण दिन डिजिटल मीडिया मधील पत्रकारांनी उत्साहात साजरा केला. यावेळी महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

महा डिजीटल मीडिया असोसिएशन संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संध्याकाळी ‘वकीलपत्र’ या युट्युब चॅनल वरती संस्थापक सचिव अद्वैत चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर केल्या.
त्यानंतर ‘पत्रकार संरक्षण कायदा’ बद्दल प्रा. अजय देशपांडे यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याबाबत असणाऱ्या अनेक बाबी युट्युब द्वारे सर्व उपस्थित डिजिटल मीडिया पत्रकारांना समजावून सांगितल्या तसेच या कायद्याचा कसा वापर करता येतो, गैरवापर केला तर उलट गुन्हा दाखल होऊ शकतो अश्या अनेक महत्त्वाच्या बाबींबद्दल स्पष्टीकरण केले.
त्याचबरोबर संस्थापक सचिव अद्वैत चव्हाण यांनी डिजीटल मीडिया व सायबर लॉ या बाबतीत मार्गदर्शन करून डिजीटल मीडिया मध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे याबाबत माहिती दििली

—————————————————–

व्याख्यानानंतर पत्रकारांना शासन निर्णय वितरित.

पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर प्रा. अजय देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान झालेवर लगेच सर्व पत्रकारांना महा डिजीटल मीडिया असोसिएशन कडून या कायद्याचा असणारा शासन निर्णय वितरित करण्यात आला. अश्या पद्धतीने सर्व पत्रकारांना शासन निर्णय वितरित करणारी ही पहिला संघटना ठरली आहे.

—————————————————-

या प्रतिनिधींची झाली नियुक्ती !

महा डिजीटल मीडिया असोसिएशन संघटनेसाठी पत्रकार दिनाच्या औचित्याने पदाधिकारी नेमणूक करण्यात आली. यामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कल्याणी वाघमोडे, महिला सचिव म्हणून अँड. शीतल बेंद्रे, राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून ओंकार आडत, मराठवाडा अध्यक्ष म्हणून गंगाधर डांगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून संतोष भोसले, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून प्रथमेश बनसोडे, अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून अमरदीप वानखेडे, हिंगोला जिल्हाध्यक्ष म्हणून रामू चव्हाण, बीड जिल्हाध्यक्ष म्हणून उपेंद्र कुलकर्णी , यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून सुकांत वंजारी, रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश शिंदे, विदर्भ कार्याध्यक्ष अमोल सराफ, नांदेड कार्याध्यक्ष यादव लोकडे , पुणे जिल्हा संघटक म्हणून तुळशीदास शिंदे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संतोष शिंदे , बुलढाणा कार्याध्यक्ष म्हणून श्रीकांत भुसारी, विदर्भ संघटक म्हणून विलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 तीन महिने मोफत प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद !
महा डिजीटल मीडिया असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या मोफत डिजीटल मीडिया कार्यशाळेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रोज नवनवीन माहिती व तंत्रज्ञान प्रशिक्षणार्थीना मोफत शिकवली जात आहे. यामध्ये महिला व युवती पत्रकारांचाही मोठा सहभाग आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close