राजकीय

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायत बिनविरोध

      • मतदारसंघातील एकूण चार ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

अंबाजोगाई  —-  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनलने बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

या आधी परळी मतदारसंघातील रेवली, वंजारवाडी तसेच मूर्ती ग्रामपंचायत बिनविरोध ना. मुंडे यांच्या ताब्यात आल्या आहेत. त्यानंतर आता अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायतीवर देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिनविरोध विजय मिळवला आहे.

वाकडी येथे वॉर्ड क्र. १ मधून श्रीमती अशाबाई गोमसाळे, सीताबाई कांदे, महानंदा गणगे तर वॉर्ड क्र. २ मध्ये श्री.नरसिंग गायकवाड, सौ. अरुणा गायकवाड आणि वॉर्ड क्र. ३ मध्ये श्री. सुधाकर कांदे व सौ. मिनाबाई कांदे या सर्वांची बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी सर्व नवनियुक्त सदस्य व ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close