आपला जिल्हा

पत्नीला नांदवण्यास नकार देत पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले विष; प्रकृती चिंताजनक

बीड — पत्नीला नांदवण्यास घेऊन जाणार नसल्याचे सांगत तक्रारदाराने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात विष घेतल्याची घटना आज दुपारी घडली.विष घेतलेल्या त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इम्तियाज आमेन कुरेशी (वय 30 वर्ष) अस विष घेणाऱ्या व्यक्तीच नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंता जनक आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, गेवराई शहरातील रहिवाशी असलेल्या इम्तियाज आमेन कुरेशी यांचे लग्न 10 वर्षा पूर्वी झाले होते. त्याना दोन अपत्य आहेत,1 वर्षा पूर्वी पती-पत्नीत वाद झाल्या पासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने 20 दिवसा पूर्वी पत्नी ने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली होती. या तक्रारीवर आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात तिसरी तारीख होती. पत्नी नांदण्यास तयार असताना..तिला नांदवनार नाही.. म्हणत त्याने विष घेतले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात सगळा गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या पतीला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close