क्राईम

एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर तलवारीने हल्ला

-बीड — तू मला का बोलत नाहीस,तु मला धोका दिलास म्हणत अल्पवयीन तरुणीवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. ही घटना महालक्ष्मी चौकातील रामनगर मध्ये घडली. जखमी तरुणीवर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीस न्यायालयात हजर केले असता पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.

बीड शहरातील लक्ष्मी चौक भागात राहणान्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीची ओळख याच भागातील पोपट बोबडे वय 27वर्ष याच्या सोबत झाली . काही दिवस ते भ्रमणध्वनीवर बोलत असायचे . एके दिवशी पोपट बोबडे हा तिच्या घरी आला तेव्हा या तरुणीने यापुढे तू घरी येत जाऊ नकोस आणि बोलूही नको असे म्हटले परंतु तरीही बोबडे तरुणीच्या घरासमोर येत जात असायचा . सदरच्या तरुणीस जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा त्यामुळे ती तरुणी काही दिवस आपल्या एमआयडीसी भागातील घरात राहण्यासाठी गेली होती . आईच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ती पुन्हा महालक्ष्मी चौकातील रामनगर येथील घरात राहण्यासाठी आली असता ३१ डिसेंबर रोजी पोपट बोबडे याने तिच्यावर तलवारीने हल्ला केला . या हल्ल्यात तिच्या एका हाताला आणि पायाला मोठी जखम होऊन तिला फॅक्चर झाले . एवढेच नव्हे तर तिच्या केसाला धरून ओढतही नेले . भयभीत झालेली तरुणी आजी – आजोबाकडे पळत गेली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला . या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात आरोपी विरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला . रात्री पोलिसांनी बहिरवाडी शिवारातून त्याला जेरबंद केले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close