देश विदेश

माजी मंत्र्याच्या घरावर ईडी चा छापा, ड्रायव्हरच्या नावे आढळली 200 कोटीची संपत्ती

नवी दिल्ली — आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असणारे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासोबतच कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापे मारण्यात आले. या कारवाईमध्ये अनेक कागदपत्र, हवाला माध्यमातून फिरवण्यात आलेल्या पैशांसदर्भातील माहिती ईडीच्या हाती लागली आहे.

या कारवाईमध्ये गायत्री प्रजापतींबरोबरच त्यांची मुले आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहे.

माजी खाण मंत्री असणाऱ्या प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या 44 हून अधिक ठिकाणच्या संपत्ती आणि जमिनींसंदर्भातील माहिती समोर आली आहे.या सर्व संपत्तीची किंमत तीन हजार 790 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचे कागदपत्र सापडल्याने या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार 11 लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख किंमतीचे स्टॅम्प पेपर आणि इतरही बरीच संपत्तीची माहिती ईडीला मिळाली आहे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रजापती यांनी आपल्या नोकरांच्या नावाने संपत्ती जमा केल्याचे उघड झाले आहे. प्रजापती यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 200 कोटींची संपत्ती असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागण्याचे वृत्त आहे.

दरम्यान, लखनऊमध्ये प्रजापती कुटुंबाने 110 एकर जमीन खरेदी केल्याचेही या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. आता ईडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पुण्यामधील नोंदणी विभागाकडून येथील संपत्तीसंदर्भातील माहिती मागवली आहे.2019 साली ऑगस्टमध्ये गायत्री यांच्याविरोधात हवाला कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या गायत्री प्रजापती हे सामुहिक बलात्कार प्रकरणी तुरुंगात आहेत तर त्यांचा मुलगा आर्थिक घोटाळ्यांच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close