देश विदेश

योगींच्या राज्यात चक्क पाकिस्तानी महिला बनली सरपंच

लखनौ — उत्तर प्रदेशातील एका गावात चक्क पाकिस्तानी महिला सरपंच बनली.ही महिला संरपंच होईपर्यंत गावातील कुणालाही, ती पाकिस्तानी असल्याची साधी भनकही लागली नव्हती.या महिलेने सरपंच होण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रही तयार केले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बानो बेगम ही पाकिस्तान मध्ये राहणारी 64 वर्षीय महिला 35 वर्षांपूर्वी एटा जिल्ह्यातील तिच्या नातलगाकडे आली होती. येथे आल्यानंतर तिने अख्तर अली या युवकाशी तिने लग्न केले तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतातच राहते मात्र अद्याप तिला भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.
पंचायत समिती निवडणूक जिंकली
2015 मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये बानो बेगमने उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये तिचा विजय झाला. मात्र 2020 च्या जानेवारी महिन्यामध्ये या गावच्या सरपंच शहनाज बेगम यांचे निधन झाले. यावेळी राजकीय समीकरण जुळवत गाव समितीच्या शिफारशीने सरपंच पद देखील तिने मिळवलं. बानो हिने सातत्याने व्हिसाचा कालावधी वाढवत सरपंच पद देखील मिळवले अशी माहिती पोलिसांनी दिली.
अखेर भांडाफोड झालाच
गावातील स्थानिक नागरिक कुवैदन खान यांना या महिलेचा संशय आला. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच या महिलेने सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी (DPRO) आलोक प्रियदर्शी यांनी एटा जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांच्यासमोर हे प्रकरण सादर केले आहे. त्यांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हा पंचायत राज अधिकारी आलोक प्रियदर्शी म्हणाले, “बानो बेगमविरोधात मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ती पाकिस्तानची नागरिक असल्याचे आढळून आले आहे. तिने बनावट पद्धतींद्वारे भारताचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डदेखील तयार केले असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा दंडाधिकारी भारती म्हणाले, “ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी संबंधित महिलेने आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे कशी मिळविली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.” याशिवाय, बानो यांना सरपंच म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करणारे ग्राम सचिव ध्यानपाल सिंह यांचीदेखील त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close