क्राईम

डोक्याला पिस्तूल लावत चाकूने बाप-लेकांने केली एकास मारहाण

केज – मुलाने 40 वर्षीय शेतकऱ्याच्या कानपट्टी ला पिस्तूल लावले तर बापाने या शेतकऱ्यावर चाकूने वार करत दोन साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना बेलगाव येथे बुधवार दिनांक 30 डिसेंबर रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की बेळगाव येथील पांडुरंग रघुनाथ चौरे हे 30 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या घरासमोर उभे असताना प्रताप नर्सिंग दातार, नरसिंग लिंबाजी दातार व त्यांच्या इतर दोन साथीदार चौरे यांच्याजवळ आले. यावेळी प्रताप दातार यांने पांडुरंग चौरे यांच्या कानपट्टी ला पिस्तूल लावून तुझा भाऊ कुठे गेला आहे आहे ते लवकर सांग? अशी विचारणा केली ‌ तर नरसिंग दातार यांनी चाकू काढून चौरे यांच्या डाव्या हातावर वार केला. यावेळी चौरे यांचा चुलत भाऊ सोडवण्यासाठी गेला असता दातार यांच्या दोन साथीदारांनी त्याला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून निघून गेले याप्रकरणी पांडुरंग चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात 4 विरोधात गु. र. नं. ५५९/२०२० भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायद्याचे कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close