आपला जिल्हा

आधार माणुसकीच्या ग्रुपला खाकीची उर्जा; गरजूंना उबदार कपड्यांची भेट देऊन सरत्या वर्षांला निरोप

                 सुभाष सुतार

गेवराई —-  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकीकडे जोरदार तयारी सुरू असतानाच, खाकीतल्या वर्दीने कोरोना महामारीच्या कटू अनुभवाकडे पाठ फिरवून, थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या नागरीकांना पांघरायला उबदार कपड्यांची भेट देऊन नव वर्षाचे स्वागत केले. खाकीतल्या या उबदार उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर राहून या ग्रुपच्या वतीने उपेक्षित, वंचित , गरजूंसाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. विशेष म्हणजे, कसलाही गाजावाजा न करता “आधार माणुसकीचा” या ग्रुपच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.सुंदरबन, आधार माणुसकीचा, या वाॅट्सअप ग्रूपच्या विद्यमाने रणजित पवार यांच्या संकल्पनेतून मंगळवार ता. 29 रोजी रात्री अकरा वाजता, सदरील स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रुपचे सदस्य सार्वजनिक ठिकाणी व गरजू नागरिकांपर्यंत जाऊन थंडीत पांघरायला उपयोगी येणारे उबदार कपडे भेट देऊन बांधिलकी जोपासून नव वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाला सदस्यांनी चांगला प्रतिसाद देऊन, योगदान दिले आहे. या वेळी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौबे, सपोनि संदीप काळे, भूषण सोनार, नारायण खटाने, राकेश ठाकूर, कपिल गोडसे, जग्गनाथ पवार, अण्णासाहेब डोके, प्रतिक राका, अजित मुळीक, अमोल देशमुख, किरण बेदरे, नवनाथ ठोसर, महादेव काळे, प्रा. महेश चौरे, स्वामी अण्णा, खमितकर यांनी उपक्रमात भाग घेतला. दरम्यान, सर्वच पातळ्यांवर अडचणीचे ठरलेल्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी खाकीतल्या वर्दीने कोरोना महामारीच्या कटू अनुभवाकडे पाठ फिरवून, थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या नागरीकांना पांघरायला उबदार कपड्यांची भेट देऊन नव वर्षाचे स्वागत केले. खाकीने राबविलेल्या उबदार उपक्रमाचे शहरात कौतुक केले जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close