आपला जिल्हा

मी तर संदीप भैयांना दुःखात साथ दिली,सुखातले कारभारी दुखात कुठल्या बिळात होते– बाळासाहेब गुंजाळ

बीड — संदीप क्षीरसागर यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करण्यात मी अग्रेसर होतो, याची साक्ष माझ्या भागातील मताधिक्य देईल मात्र निवडून आल्यानंतर जी वागणूक मला देण्यात आली तो माझा अपमान आहे . माझ्यावर धनाचा आरोप करणारे तेव्हा कुठल्या बिळात होते . मनाने काम करणारे कार्यकर्ते दूर असून धनाची भाषा करणारे आज आमदार साहेबांचे कारभारी नाहीत का ? आपण तर दुःखात साथ दिली, आता सुखात आम्हाला दूर अन भामट्या लोकांना जवळ घेतल्याने आम्ही भरल्या ताटाला दूर केले आहे. त्यामुळे चिमकुऱ्या कार्यकर्त्यांनी पत्रकबाजी करण्यात वेळ घालू नये नाहीतर पत्रकांची उत्तरे आमच्या पद्धतीने देता येतात असे बाळासाहेब गुंजाळ यांनी म्हटले आहे .

पत्रक काढणाऱ्या शक्तिमान सदस्याने हे माहित करून घेतले पाहिजे कि डॉक्टर जोगदंड हा संदीप भैय्याच्या कार्यकर्त्यांना पत्त्याचे क्लब टाका , मटका, गुटखा, अवैध वाळू वाहतूक, गव्हाचा काळाबाजार, दारूचे तसेच कोणतेही दोन नंबरचे धंदे करा, मी पोलीस डिपार्टमेंट ला सांगून तुम्हाला मदत करतो असे कार्यकर्त्यांना सांगत आहे. स्वतः एक नंबर मध्ये गुत्तेदारीचा धंदा करायचा व गुत्तेदारी मध्ये कोणी वाटेकरी नको म्हणून कार्यकर्त्यांना दोन नंबरचे धंदे करायला हा गुत्तेदार भाग पाडत आहे. यामुळे एक पिढी बरबाद करण्याचे काम डॉक्टर जोगदंड मार्फत सुरू आहे.बीड शहरातील हिंदू वॉर्ड मधून सगळ्यात जास्त लीड माझ्या वॉर्ड मधून आहे, मी संदीप भैय्याला दुःखात साथ दिली व सुखात असताना सोडून का गेलोय याचा विचार कार्यकर्त्यांसह शहरातील जनतेने करावा. संदीप भैय्या आमदार झाल्यानंतर सर्वात जास्त माझा संपर्क डॉक्टर जोगदंड यांच्याशी होता. गेल्या वर्षभरामध्ये या गुत्तेदार जोगदंडने कार्यकर्त्यांमध्ये आपसात भांडणे लावलेली आहेत तेही माझ्या समक्ष, याला इतक्या कोटीचे काम देतो त्याला तितक्या कोटीचे काम देतो असे कार्यकर्त्यांना नादी लावण्याचे काम डॉक्टर जोगदंड मार्फत सुरु आहे हे कधी नेतृत्वाने जाणून घेतले का असा सवाल बाळासाहेब गुंजाळ यांनी उपस्थित केला आहे .

डॉ जोगदंडचे धंदे एक नंबर आणि कार्यकर्ते मात्र दोन नंबर.

बाळासाहेब गुंजाळ यांनी पत्रकातून आवाहन केले आहे कि ” या लबाड डॉ जोगदंड पासून सावध राहा याच्या कसल्याही शब्दावर विश्वास ठेवू नका. आपसात ठरवून डॉक्टर जोगदंडला कार्यकर्त्यांशी खोटं बोलायला कोण लावतंय, तसेच अधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून कशाप्रकारे मलिदा लाटला जातो हे मला बीड शहराला सांगायला भाग पाडू नका. त्यामुळे डॉक्टर जोगदंड ला निर्वाणीचा इशारा देऊन सांगतो कवडीची अक्कल नसलेल्या कार्यकर्त्यांमार्फत माझ्याविरोधात पत्रकबाजी केल्यास व मला नाहक बदनाम केल्यास तुमचे सगळे काळे कारनामे जनतेसमोर मांडण्याचा इशारा नगरसेवक बाळू गुंजाळ यांनी दिला आहे.भैय्यांच्या विजयासाठी जिवाच रान केलेल्या कार्यकर्त्यांची व पडद्यामागील सहकाऱ्यांची नावे इथे घेत नाही पण एकच सांगतो या जोगदंडने कोणालाही सोडले नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close