देश विदेश

शेतकरी आंदोलनाने 113 वर्षापूर्वीचा इतिहास जागा झाला;शहिद भगतसिंगांच्या चूलत्यांनी केले नेतृत्व,9महिने सूरु होते आंदोलन

नवी दिल्ली — इंग्रज सरकारने छोट्या शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आबादकारी बिल 1907 साली आणले होते हे बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल नऊ महिने शीख समुदायाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन चालले होते. या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व शहीद भगतसिंग यांचे चुलते सरदार अजितसिंह यांनी केले होते. इंग्रज सरकारने हे बिल मागे घेतल्यानंतरच हे आंदोलन रद्द करण्यात आले. मोदी सरकार विरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे पुन्हा 113 वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
बहुमताच्या जोरावर केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तीन कृषी कायदे लागू केले आहेत. हे तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे असून शेती अडचणीत येईल त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात यावे अशी मागणी करत गेल्या पस्तीस दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश बिहार या दिल्लीच्या जवळ असलेल्या राज्यांमध्ये या आंदोलनाचा जोर अधिक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील या आंदोलनात सामील झाले आहेत. या आंदोलनात देखील कृषी कायद्याच्या विरोधात शिख समुदायाचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून त्यांनी दिल्लीची कोंडी केली आहे. हे आंदोलन केंद्र सरकारच्या गळ्याचा फास बनत असून शेतकरी आज न उद्या हे आंदोलन गुंडाळतील अशी अपेक्षा देखील सरकारला आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र इंग्रज सरकार विरुद्ध कृषी कायद्याविरोधात 113 वर्षापूर्वी सुरु झालेल्या आंदोलनाची आठवण ताजी केली आहे. 1907 साली शहीद भगतसिंग यांच्या चुलते सरदार अजीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली तब्बल नऊ महिने इंग्रज सरकार विरोधात शेतकरी आंदोलन चालू राहिले होते. या आंदोलनापुढे इंग्रज सरकार झुकले नंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
असा होतं इंग्रजांनी आणलेला कायदा

■■ कोणताही शेतकरी आपल्या शेतात असलेले झाड तोडू शकणार नाही, जर कोणी झाड तोडले तर 24 तासात त्याची जमीन सरकारच्या नावे होणार,
■■ दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की शेतकऱ्याच्या थोरल्या मुलाच्या नावेच त्याची जमीन वारसा हक्काने जाऊ शकते, थोरला मुलगा नसेल आणि शेतकरी मयत झाला की जमीन इंग्रज सरकारच्या नावावर होईल
■■ त्याच बरोबर नदी, ओढे यावर भिजणाऱ्या बागायत शेतीवरील कर या कायद्याने दुप्पट केला होता.

‘ पगडी संभाल जट्टा ‘ अशी हाक देत सरदार अजितसिंह यांनी या आंदोलनाची मशाल पेटवली होती.
22 मार्च 1907 साली सुरू झालेले हे शेतकरी आंदोलन इंग्रज सरकारने कायदा मागे घेतल्यानंतर नोव्हेंबर 1907 मध्ये समाप्त झाले होते. एवढ्या मोठ्या यशस्वी आंदोलनाची प्रेरणा पाठीशी असल्यानेच सध्या दिल्लीत किसान आंदोलन जोमात आणि जोशात पुढे चालले आहे.

आजवर अनेक आंदोलने दुर्लक्ष करून मोडीत काढणाऱ्या मोदी सरकारने या आंदोलनाकडे ही दुर्लक्ष केले आहे आणि सोशल मीडियावर भाजप समर्थकांनी या आंदोलनात खलिस्तान वादी असल्याचे आरोप करीत आंदोलन बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र तरीही मागील 5 आठवड्यापासून हे आंदोलन सुरूच असून त्याचा जोर कायम आहे. इंग्रजांना झूकवल्यानंतर मोदी सरकारला देखील आम्ही झूकवू अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close