आपला जिल्हा

वनविभागाच्या तपासणीचा फार्स, कागदपत्राविना चौकशी वांझोटीच

चौकशी आधिका-याचीच चौकशी करण्याची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बीड — जिल्ह्य़ातील वनविभागातील डीपीटीसी मधून दिलेल्या 10 कोटी 84 लाख रूपयांच्या वनाधिका-यांनी कागदोपत्रीच केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील वनविभागाचे श्री.कंद नावाचे चौकशी आधिकारी आले. परंतु कोणते काम तपासत आहोत त्या कामाचे कार्यारंभ आदेश अथवा किती निधी खर्च झाला याविषयी कोणतीही माहीती शेवटपर्यंत मिळालीच नाही, त्यामुळेच चौकशी व तपास वांझोटाच ठरल्यात जमा आहे.

मार्च 2020 अखेरीस राहुल रेखावार जिल्हाधिकारी बीड यांनी डीपीडीसी मधुन वनविभागातील विविध कामांसाठी 10 कोटी 84 लाख रूपये निधी दिला.मात्र काम कागदोपत्रीच दाखवून नातेवाईकांच्या नावावर निधी उचलून हडप केला.यासंबधी शिवशंकर भोसले उदयनराजे प्रतिष्ठान युवा जिल्हाध्यक्ष ,डाॅ.गणेश ढवळे, गवळी यांनी वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर वरिष्ठां मार्फत चौकशीसाठी श्री.कंद यांचीने नेमणुक करण्यात आली.

विना कागदपत्राचीच चौकशी कशी?

चौकशी समितीसाठी आलेले श्री.कंद यांना बीड कार्यालयातच कार्यारंभ आदेश, अंदाजपत्रक व ईतर कागदपत्रे सोबत घेण्याची वारंवार विनंती केल्यानंतर वनपाल कागदपत्रे घेऊन पोहचला असेल असे सांगितले प्रत्यक्षात करचुंडी येथिल वनात गेल्यानंतर कागदपत्रे विसल्याचे सांगितले.यावरून चौकशी आधिका-याची नियत कळुन चुकली.
,कार्यारंभ आदेश, कुठलीच कागदपत्रे चौकशी समिती सोबत नव्हती त्यामुळे चौकशी समितीशी सहमत नसुन भविष्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल.

वनविभागात जेसीबीने काम कसे??परराज्यातील मजूरांमार्फत काम का?

राखीव वनविभागात जेसीबी मशिनने काम कसे??कोणी परवानगी दिली?? कोरोना कालावधीत मजूर कोठून आणले??,परराज्यातील मजूर कसे? मार्च एण्ड मध्ये काम करून उचललेल्या निधीचे काम सध्या कसे??या कुठलल्याही प्रश्नाचे उत्तर बीड च्या मधुकर तेलंग ,वनपाल मोरे यांच्याकडे नव्हता त्यामुळेच कागदपत्रा विना चौकशी वांझोटीच ठरली .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close