आपला जिल्हा

निवडणूक निर्णय अधिकारी पॅनलवर अँड. अजित देशमुख यांची नियुक्ती

बीड —  सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी अँड. अजित एम. देशमुख यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पॅनलवर निवड करण्यात आली आहे. क आणि ड दर्जाच्या संस्थांच्या निवडणुका आता त्यांना घेता येतील. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, यांनी ही नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. त्यामुळे राज्यात लाखावर सहकारी संस्थांच्या स्थापन झालेल्याआहेत. या सहकारी संस्थांची निवडणूक दर पाच वर्षांनी निवडणूक घ्यावी लागते. या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक संस्थेला निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करावी लागते.

आजजपर्यंत ही निवड शासकीय अधिकार्‍यांमधून केली जात होती. मात्र वाढता व्याप आणि अधिकाऱ्यांची कमतरता पाहून राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काम करण्यासाठी आता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या नियुक्त्या करण्याचे धोरण सरकारने मान्य केल्यानंतर ही निवड झाली आहे.

क आणि ड दर्जाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी अँड. अजित देशमुख आता पात्र ठरले आहेत. यापूर्वी अनेक निवडणुका अँड. देशमुख यांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना या कामाचा अनुभव देखील आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांनी देशमुख यांना नियुक्त दिल्यानंतर देशमुख यांचे अनेक अधिकाऱ्यांसह मित्रमंडळाने अभिनंदन केले आहे. आपण पारदर्शक आणि चांगल्या पध्दतीने निवडणूक घेऊन या क्षेत्रातही काम करू, असे देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close