आपला जिल्हा

अजित कुंभार साहेब, कार्यालया बाहेरील महास्वच्छता अभियान कार्यालयातही दाखवा, भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करा

        •           डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे आवाहन

बीड — अजित कुंभार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी महास्वच्छता अभियान राबवत झाडे हातात घेऊन तासभर श्रमदान करत “आपले कार्यालय आपले घर ” म्हणत स्वच्छतेचा संदेश दिला मात्र कार्यालयीन भ्रष्टाचार प्रकरणात 10-12 महिने तक्रार करून कारवाई करताना दिसत नाही म्हणून स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त जिल्हा परीषद करण्याचे जाणीवपूर्वक टाळताना दिसतात .

दि.23 डिसेंबर बुधवार रोजी पहाटे सीईओ अजित कुंभार यांनी कार्यालय गाठत आधिकारी व कर्मचा-या समवेत तासभर श्रमदान करून नियमित स्वच्छता ठेवण्याचा संदेश देत “आपले कार्यालय आपले घर ” असा जनतेला संदेश दिला त्याबद्दल अभिनंदन, परंत हाच संदेश भ्रष्टाचार युक्त जिल्हापरिषद करून दाखवावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

जिवाची वाडी दोषारोपपत्र सिद्ध होऊनही कारवाई नाही

केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथील सन 2018-19 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगातुन केलेल्या कामासंदर्भात भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यासाठी दि. 23/07/2019 रोजी विस्तार आधिकारी श्री.कांबळे व्ही. एम.व श्री.चव्हाण एस. एम.(शा.अ.)यांची मा. कार्यकारी दंडाधिकारी, केज यांचे पत्र क्रं.2019/एमएजी/कावी/384/2019 दि.01/08/2019 नुसार चौकशी करून तात्काळ अहवाल देण्यास सांगितले.त्या आदेशानुसार विस्तार आधिकारी यांनी दि. 01/09/2020 रोजी श्री.दराडे गटविकास आधिकारी पं.स.केज यांना अहवाल सादर केला.

ग्रामसेवक धपाटे व सरपंच कुटे भ्रष्टाचार प्रकरणात दोषी सिद्ध- विस्तार आधिकारी कांबळे व्हि. एम.

विस्तार आधिकारी कांबळे यांनी दराडे गटविकास आधिकारी पं.स.केज यांना पाठवलेल्या अहवालात धपाटे ग्रामसेवक यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या जळ खरेदी वस्तु नमुना नं.16 वर नोंद नसल्याचे तपासणीत आढळून आल्यामुळे दोषी असल्याचे म्हटले आहे.ग्रां.पं.ची चटई खरेदी करताना चेक नं.38821 अदाई केली आहे .परंतु रक्कम 50 हजार रूपयांची खरेदी आहे.दरपत्रक न मागवता अनियमितता केली आहे. दलित वस्ति सिमेंट क्राॅक्रीट रस्ता 7 लक्ष रूपये मंजूर असून कामाचे ई-टेंडरींग केलेले आहे, काम सुरू न करताच गुत्तेदाराला 2 लाख रूपये अग्रिम देण्यात आलेले आहे. ग्रामसेवकाने अनियमितता केली आहे.दलित वस्तीचे काम आर्थिक व भौतिक दृष्ट्या पूर्ण झाल्याचे दिसून आले मात्र तांत्रिक दृष्ट्या पुर्ण नसल्याचे दिसुन आले. धपाटे ग्रामसेवकाने 14 व्या वित्त आयोगातुन 13 जून 2018 रोजी बायनेम चेक कॅश करून 50 हजार रूपये उचल करून नक्कीन मशिन खरेदी केली आहे,सदरील मशिनचे कोटेशन व दरपत्रक न मागवल्यामुळे अनियमितता दिसून आली असून यास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार आहे.
दि.14 फेब्रुवारी 2019 रोजी किर्द क्रं.18 वर चेक क्रं. 18236 प्रमाणे 90 हजार रूपये उचलुन 14 व्या वित्त आयोगातुन शाळा दुरूस्तीचे काम दाखवले आहे. परंतु किर्दीप्रमाणे दाखविलेले काम तांत्रिक मान्यता न घेता किर्दीवर सादर खर्च दाखवून ग्रामसेवक यांनी 90 हजार दाखवून अपहार दिसुन येतो. वरील सर्वास ग्रामसेवक व सरपंच दोषी आहेत. वरील प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यातयावी अशी लेखी मागणी करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाही .

विभागीय आयुक्तानी अजित कुंभार यांना 2 वेळा लेखी आदेश देऊन सुद्धा कारवाई नाही

बीड तालुक्यातील मसेवाडी 14 व्या वित्त आयोग भ्रष्टाचार प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे दि.19/09/2020 व दि.02/12/2020 रोजी चौदाव्या वित्त आयोगातुन पाणी पुरवठा योजनेवर आर. ओ.प्लांट न बसवताच निधी उचलणे,शेतकरी सहल प्रत्यक्षात न नेताच 30 हजार रूपये अपहार, मेडीक्लोर खरेदी अपहार, 11 युनिट नग असताना कागदोपत्री 378 नग दाखवून 26 हजार 671 रू अपहार प्रकरणात 10 महिने होऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळेच अजित कुंभार यांनी कार्यालया बाहेरील महास्वच्छता अभियान भ्रष्टाचार मुक्त जिल्हा परीषद करण्यासाठी वापरावे या प्रकरणात जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री,शालेय शिक्षण मंत्री, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड व विभागीय आयुक्त यांना लेखी तक्रार केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close