आपला जिल्हा

चौसाळा चेक पोस्ट सुरक्षेसाठी की लुटी साठी ?

बीड  — उस्मानाबाद जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद बीड जिल्हा सरहद्दीवर चौसाळा येथे चेक पोस्ट सतर्क ठेवण्यात आले आहे. परंतु ही सतर्कता जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी की लूटीसाठी असा प्रश्न विचारला जात आहे. केंद्रेच्या कारभाराच्या केंद्रस्थानी वर कमाईला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे अवैध धंद्यांना देखील ऊत आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर चौसाळा येथे चेक पोस्ट वर लक्ष ठेवले जात आहे. परंतु आता या चेक पोस्ट चा उद्देश पूर्ण बदलला असून या चेक पोस्ट वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी केल्या जाते. पण ती तपासणी सुरक्षेसाठी नव्हे तर पैसे उकळण्यासाठी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात या सरहद्दीवरून मोठ्या प्रमाणात गुटखा जिल्ह्यात आणला जातो परंतु आतापर्यंत एकदाही पोलिसांच्या हाती गुटखा सापडला नाही. पोलिसांना या चेक पोस्ट वर कर्तव्य बजावत असताना आक्षेपार्ह एकही गोष्ट आढळल्याचे कागदोपत्री तरी दिसत नाही.कागदपत्रांच्या पडताळणीच्या नावाखाली वाहनचालकांना मानसिक त्रास देत पोलिसांकडून ही राजरोज लूट होत आहे. परिणामी चौसाळा परिसरातील गावांमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चेक पोस्टवर चार होमगार्ड व तीन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कर्तव्यावर असलेल्या होमगार्डच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोलीस कर्मचारी हे काम पार पाडत आहेत. होमगार्ड गाड्या अडवण्याच काम इमानेइतबारे करतात तर पोलीस कर्मचारी मांडवली करत या गाड्या सोडून देतात होमगार्ड हे सर्व पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही. एकंदरच या चेक पोस्ट मुळे रोगापेक्षा ईलाज भयंकर असं म्हणण्याची वेळ येऊ लागली आहे. नेकनुर पोलीस ठाण्याचे सर्वेसर्वा यांनी कर्मचाऱ्यांना फक्त पैसा ‘केंद्र’ स्थानी ठेवावा असे आदेश देत लक्ष्मण रेषा तर आखली नाही ना असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close