आपला जिल्हा

बेवारस रुग्णांना आधार देणाऱ्या शेख मुख्तार यांचा सत्कार

अंबाजोगाई —  जात – धर्म , गरीब -श्रीमंत असा कोणालही भेदभाव न करता बेवारस रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे शेख मुख्तार यांना गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले .

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे , मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया , मनोज लखेरा , बब्रुवान पोटभरे ,खमरोद्दीन
फारूखी , हकीमलाला पठाण , एम.ए. हकीम, महादेव आदमाने ,संजय गंभीरे यांची मुख्य उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी होते .
यावेळी समाजसेवक शेख मुख्तार यांना मान्यवरांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले . पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह , सन्मानपत्र, शाल , पुष्पहार असे होते .
याप्रसंगी राजकिशोर मोदी , पृथ्वीराज साठे , अनिकेत लोहिया , बब्रुवान पोटभरे , शेख आझम , एम.ए. हकीम , शेख राहिम , शेख उमर फारूख , भागवत तावरे , संजय साळवे व इतर मान्यवरांनी शेख मुख्तार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले .
सुरुवातीला हकीमलाला पठाण यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिक हाश्मी व फराह फारूकी यांनी केले . शेवटी शेख आबेद यांनी सर्वांचे आभार मानले .
मागील पंधरा वर्षापासून शेख मुख्तार हे अविरत समाजसेवा करीत आहेत . येथील स्वामी रामानंद तीर्थ
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात . ज्या रुग्णांना कोणताही नातेवाईक नाही त्यांना शेख मुख्तार जेवणाचा डबा , औषधे , फळे पुरविण्याचे निस्वार्थ काम करतात . अनेक बेवारस रुग्णांचे उपचारादरम्यान निधन झाल्यास सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर अंत्यविधी करण्याची जबाबदारी शेख मुख्तार व त्यांचे सहकारी घेतात . मृतरुग्ण ज्या धर्माचा असेल त्याप्रमाणे अंत्यविधी करण्यात येतो .
अनेक करोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठीही शेख मुख्तार यांनी पुढाकार घेतला होता . सामाजिक कार्यकर्ते हकीमलाला पठाण यांनी गरीबांच्या भोजनासाठी रोटी बॅकेचा प्रकल्प राबविला . त्यामुळे हजारों नागरिकांना मोफत जेवण मिळू लागले .
कार्यक्रमानंतरही अनेक नागरिक व विविध संस्थांच्या वतीने शेख मुख्तार यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला . काही जणांनी आर्थिक मदत देऊन सामाजिक कार्यात पुढे जाण्याचे बळही दिले .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close