क्राईम

उसाच्या बैलगाडीला मोटार सायकल स्वाराची धडक, युवक ठार

माजलगाव — साखर कारखान्याकडे जात असलेल्या उसाच्या गाडीला मोटारसायकल स्वारांने जोराची धडक दिले या दुर्घटनेत मोटार सायकल स्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना साडेसात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 61 वर दुग्गड पेट्रोल पंपासमोर घडली.

अमोल बाबुराव हंडे हा 27 वर्षीय युवक माजलगाव येथून शुक्ल तीर्थ लिमगाव या आपल्या गावी मोटारसायकल वरून जात होता यावेळी तो साखर कारखान्याकडे जात असलेल्या उसाच्या बैलगाडीला जोरात जाऊन धडकला. या दुर्घटनेत अमोल हांडे याचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना दुगड पेट्रोल पंपासमोर रात्री साडेसातच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर शव ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close