आपला जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा फतवा: मतदार यादीतील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत नायब तहसीलदारांचे वेतन रोखले

बीड — जिल्हाधिकाऱ्यांच्या लहरी कारभाराचा त्रास प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांना सहन करावा लागत आहे. असाच एक नवा फतवा काढत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. मतदार यादीत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नायब तहसीलदार यांचे वेतन स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाचा कारभार समन्वयाने चालण्याची आवश्यकता असते परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभाराचा परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांना मधील दरी आणखी वाढत चालली आहे. परिणामी प्रशासनाचा कारभार ढेपाळत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदार याद्यातील त्रुटी दूर करत त्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.मतदार यादीमध्ये दुबार मतदारांची व छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या 30 हजार 440 एवढी आहे याबरोबरच 14 43 मतदारांचे वय शंभरपेक्षा अधिक आहे. यासंदर्भातील निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. मात्र या त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.या त्रुटी दूर करीत असताना फक्त नायब तहसीलदार जबाबदार असतो का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती, वेतन वाढ व इतर भत्ते रोखता येतात मात्र कोणाचे वेतन रोखता येत नाही. मात्र या आदेशामुळे महसूल प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. एकंदरच यामुळेे प्रशासनात असंतोषाची भावना निर्मामाण झाली असून संतप्त भावनााा व्यक्त होत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close