आपला जिल्हा

परळी एमआयडीसीतील कुलर कंपनीत भीषण आग

परळी — येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साई एअर कुलर इंडस्ट्रीज मध्ये बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचे कुलरचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी नगरपालिका, वैद्यनाथ साखर कारखाना आणि औष्णिक विद्युत केंद्र येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आली नगरसेवक नागरिक पत्रकार यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये सुनील सोळुंके यांचे साई एअर कुलर इंडस्ट्रीज भावाचा कारखाना आहे. या कुलरच्या कारखान्याला बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. आग लागताच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी आरडा ओरडा सुरु केला . या आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेचे गटनेते वाल्मिक कराड मुख्याधिकारी अरविंद मुंडे नगरसेवक चंदुलाल बियाणी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया राजा खान यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याची माहिती नगरपालिका अग्निशमन दल वैद्यनाथ कारखाना व औष्णिक वीज केंद्राच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. या कारखान्यात शेजारीच ऑइल मिल तसेच कपाट कारखाना असल्यामुळे इतरत्र पसरू नये यासाठी सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशामुळे लागली तसेच या आगीमुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close