क्राईम

वैद्यनाथ साखर कारखान्यात लाखोंची चोरी; 4 जण ताब्यात

परळी — भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात 38 लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संशयित म्हणून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊन मधील संगणक व इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्याचे लिपिक खदिर शेख यांनी परळी पोलीस ठाण्यात दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून ही चोरी लॉक डाऊन च्या काळामध्ये झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारखान्यामध्ये चोरी झाल्याची घटना तब्बल दोन-अडीच महिन्यानंतर लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्टोअर कीपर जी .टि. मुंडे यांच्याकडून लिपिक खदिर शेख यांना चोरीच्या घटनेची माहिती मिळाली यावेळी केलेल्या पाहणीत वर्कशॉप च्या तसेच स्टोअरच्या मागील बाजूचे शटर तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी चोरट्यांनी संगणक साहित्य दोनशे किलो काॅपर मटेरियल, चारशे किलो मिल बोरिंग, ब्रास इम्पेरियल बूश राउंड बार असे एकूण 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close